34 C
Mumbai
Friday, March 13, 2026
घरविशेषपंतप्रधान मोदींचे परदेश दौरे विकासासाठी, तर उद्धव ठाकरेंची टीका 'विनोदासाठी'

पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे विकासासाठी, तर उद्धव ठाकरेंची टीका ‘विनोदासाठी’

सामना अग्रलेखावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची जोरदार टीका

Google News Follow

Related

पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे विकासासाठी, तर उद्धव ठाकरेंची टीका विनोदासाठी असल्याचे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहलवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पंतप्रधान मोदींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर चर्चेला उधान आले आहे. तसेच आजच्या कॅगचा अहवालानुसार केजरीवाल यांनी त्यांच्या बंगल्यावर केलेल्या खर्चाची माहितीही समोर आली. अहवालानुसार, मुख्यमंत्री निवासस्थानातील टीव्हीच २८ लाख रुपयांचा असल्याची माहिती उघड झाले. तसेच केजरीवालांच्या शीशमहालावर ८ नव्हे तर ३३ कोटींचा खर्च झाल्याची माहिती समोर आली.

याच दरम्यान, शीशमहलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे विकासासाठी, तर उद्धव ठाकरेंची टीका विनोदासाठी असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच मोदींचा साधेपणा मातोश्री टू बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना दिसणार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

केजरीवालांच्या शीशमहालावर ८ नव्हे ३३ कोटींचा खर्च, २९ लाखांचा फक्त टीव्ही!

पन्नूला आली धमकी देण्याची पुन्हा खुमखुमी, महाकुंभला दिला इशारा

मध्य प्रदेशमध्ये लव्ह जिहाद !

HMPV व्हायरस; गोडसे म्हणतायत नो टेन्शन!

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटकरत म्हटले, अडीच वर्षे घरात बसून ‘अतिविलास‘ करणारे उद्धव ठाकरे सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात. हा मोठा विनोदच म्हणावा लागेल. विलासी असा आरोप करणाऱ्यांनी पंतप्रधान मोदीजींचा जीवनप्रवास बघावा. एक चहावाला पंतप्रधान होतो, तेव्हा तो त्यांच्या साधेपणानं आणि मेहनतीनंच पंतप्रधान मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाखालील देशाचा विकास होतोय.

मोदीजींनी त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात कायमच साधेपणा जपला आहे. मात्र, त्यांचा साधेपणा ‘मातोश्री टू‘ बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना दिसणार नाही. त्यामुळेच ते दिल्लीत शीशमहल बांधणाऱ्या अरविंद केजरीवालांच्या मदतीला धावून आले आहेत. पंतप्रधानांचे परदेश दौरे देशाची प्रतिमा मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी असतात. भेटवस्तूंचा विषय उगाच गाजवून देशातील विकासावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. भारताचे जागतिक स्थान उंचावले गेले आहे, याचा तुम्हाला खरा त्रास होत आहे. तूर्तास इतकेच, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा