33 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेषनवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीसांची जय्यत तयारी

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीसांची जय्यत तयारी

पोलिसांचा शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Google News Follow

Related

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहे. कोरोनाच्या संकटाच्या दोन वर्षांच्या कालावधी नंतर यंदा सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरणार आहे. थर्टीफर्स्टच्या या जल्लोषाला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस देखील तेवढ्याच ताकदीने सज्ज झालेली असून पोलिसांनी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

कोरोनाकाळात अनेक निर्बध लावण्यात आल्यामुळे मुंबईकरांना मागील दोन वर्षे थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करता आला नाही. मात्र यंदाच्या वर्षी कुठलेही निर्बध नसल्यामुळे यंदाचा थर्टीफर्स्ट मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहे. मुंबईत साजरा होणारा थर्टी फर्स्ट या उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून यासाठी मुंबई पोलिसांकडून पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे.

मुंबईत २५ पोलीस उपायुक्त, ७ अप्पर पोलीस आयुक्त, १५०० पोलीस अधिकारी, १०हजार पोलीस अंमलदार, ४६ राज्य राखीव दलाच्या तुकड्या, ३ रॅपिड फोर्स आणि १५ जलद गती पथक बंदोबस्तासाठी तयार करण्यात आला आहे.अनेक ठिकाणी वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. तर रॅश ड्रायव्हिंगपासून ते तळीरामांपर्यंत सर्वांवर कारवाई करण्यासाठी २ हजार वाहतूक पोलीस शहरात तैनात असणार आहेत.

हे ही वाचा:

लव्ह जिहादची वाढती प्रकरणे, हिंदू मुलींचे कुठे चुकते आहे?

आमच्याशी निर्दयीपणे कसे काय वागू शकता? उद्धव ठाकरे हताश!

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक नितीन मनमोहन यांचे निधन

आरएसएसने नाही काँग्रेसनेच नेहमी संविधानाला नुकसान पोहचवले

दोन वर्षापासून कोरोनामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाची ब्रेथ ॲनालायझर तपासणी बंद करण्यात आली होती. यंदा ब्रेथ अनालायझर चे शस्त्र बाहेर काढण्यात आले आहे.गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारे रस्ते, नेताजी, सुभाष रोड, मरीन ड्राईव्ह, गफारखान रोड, वरळी सी फेसला लागून असलेला रस्ता, जुहू तारा रोड या रस्त्यांवर सायंकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नो पार्किंग झोन राहणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा