33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषचित्रपट निर्माता-दिग्दर्शक नितीन मनमोहन यांचे निधन

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक नितीन मनमोहन यांचे निधन

Google News Follow

Related

वर्षाच्या संपता संपता आणखी एका बॉलिवूड कलाकाराने जगाचा कायमचा निरोप घेतला.बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक नितीन मनमोहन यांचे निधन झाले आहे.  नितीन मनमोहन यांचे गुरुवारी सकाळी मुंबईत वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. ३ डिसेंबरपासून ते रुग्णालयात दाखल होते आणि गेले १५ दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नितीन मनमोहन यांना ३ डिसेंबर २०२२ रोजी हृदयविकाराचा झटका आला होता.  त्यांना नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सतत खालावत चालली होती. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले असले तरी त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. नितीन मनमोहन यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. नितीन मनमोहन यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा दोघेही त्यांच्यासोबत होते आणि त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही

तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार

खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक

नितीन मनमोहन हे चित्रपटांचे प्रसिद्ध खलनायक मनमोहन यांचे पुत्र आहेत. वडिलांप्रमाणे नितीन मनमोहनही चित्रपटसृष्टीशी संबंधित होते.  नितीन मनमोहन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली होती. ‘बोल राधा बोल’, ‘लाडला’, ‘दस’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे निर्माते मनमोहनने सलमान खानचा ‘रेडी’ चित्रपटही तयार केला. विशेष म्हणजे नितीन हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनमोहन यांचा मुलगा आहे. मनमोहन ‘ब्रह्मचारी’, ‘गुमनाम’ आणि ‘नया जमाना’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा