29.1 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरक्राईमनामाखंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक

खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक

योगेश भोईर यांनी विकासकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप

Google News Follow

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. खंडणी प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ कडून खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने सुमारे तीन तास चौकशी केल्यानंतर योगेश भोईर यांना अटक केली आहे. त्यांच्यावर भादंवि कलम ३८६ अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. बोईर याना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे.

खंडणी आणि सावकारी कायद्यानुसार, भोईर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवलीतील समता नगर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात विकासकांकडून दोन कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली होती. या प्रकरणी भोईर यांना जामीनही मंजूर झाला होता. परंतु एका जुन्या गुन्ह्यातलं प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे आले. या प्रकरणात त्यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

भातखळकरांची टीका; राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधकांचा खेळ

आदित्य, राष्ट्रवादीचा शेवाळे प्रकरणाशी काय संबंध?

पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला

सीमावर्ती बांधवाना वाऱ्यावर सोडणार नाही.. इंच इंच लढू

योगेश भोईर हे ठाकरे गटाचे कांदिवलीतील उपविभागप्रमुख आणि माजी नगरसेवक आहेत. भोईर यांच्या पत्नीने अटकपूर्व जामीन असतानाही योगेश भोईर यांना अटक करण्यात आल्याचा दावा केला आहे. या अटकेला त्यांनी विरोधही केला आहे. परंतु, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, भोईर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला हा नवा गुन्हा असल्याचे गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. भोईर यांच्या अटकेनंतर शिवसैनिकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ओळखून भोईर यांना रात्री कांदिवली येथून दक्षिण मुंबईतील क्राईम ब्रांच कार्यालयात हलवण्यात आलं होतं.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा