31 C
Mumbai
Sunday, February 1, 2026
घरविशेषबरेलीत जुम्म्याच्या नमाजानंतर 'आय लव्ह मोहम्मद' रॅली, तोडफोड, दगडफेक

बरेलीत जुम्म्याच्या नमाजानंतर ‘आय लव्ह मोहम्मद’ रॅली, तोडफोड, दगडफेक

बरेलीत वाढविली सुरक्षा, तौकीर रझा नजरकैदेत

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशच्या बरेली शहरात शुक्रवारी जुम्म्याच्या नमाजानंतर मुस्लिम समाजाच्या लोकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत आंदोलन केले. “आय लव्ह मोहम्मद” असे लिहिलेले पोस्टर व बॅनर हातात घेऊन शेकडो लोक विविध भागांत घोषणा देत फिरत होते. मात्र खलील स्कूलजवळ काही असामाजिक घटकांनी गोंधळ घालत तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचबरोबर इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल (IMC) चे प्रमुख मौलाना तौकीर रजा यांना नजरेकैद करण्यात आले.

श्यामगंजमध्ये पोलिसांशी राडा

श्यामगंज भागात पोलिसांनी निदर्शकांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी एसपी क्राईम यांच्यासोबत थोडी शाब्दिक चकमकही झाली. तरीही जमाव घोषणा देत पुढे गेला. खबरदारी म्हणून श्यामगंजमधील दुकाने बंद करण्यात आली. नौमहला मशीदीसमोरही शेकडो लोक जमले. याच दरम्यान खलील स्कूल भागात काही निदर्शकांनी अचानक वाहनांवर दगडफेक व तोडफोड सुरू केली. पोलिसांनी शांततेची विनंती केली, पण जमाव न ऐकल्याने लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर गोंधळ व पळापळ झाली.

हे ही वाचा:

मिग- २१ सोबत अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची आहे खास आठवण!

हिंसाचारानंतर लेहमध्ये कशी आहे परिस्थती?

“पूर्वजांची चूक, ओवैसींसारख्यांना पाकिस्तानात हाकललं असतं, तर असे जिन्ना भारतात जन्मले नसते”

सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि लडाख समोरील खरा प्रश्न..!

मौलाना तौकीर रजा यांची घोषणा

तौकीर रजा खान यांनी ‘आय लव्ह मोहम्मद’ प्रकरणात राष्ट्रपतींना जिल्हाधिकारीमार्फत निवेदन सादर करण्याचे जाहीर केले होते. त्यांनी सर्वांना शांततेने सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर गुरुवारपासूनच बरेलीत सुरक्षा वाढवण्यात आली होती. शुक्रवारी सकाळपासून इस्लामिया मैदान व बिहारीपूर परिसर छावणीमध्ये बदलला गेला. श्यामगंज मंडी रोडवर बॅरिकेडिंगसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

मौलानांचा व्हिडिओ संदेश

शुक्रवारी सकाळी मौलाना तौकीर रजा यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत, “मीडियामध्ये चाललेल्या काही बातम्या चुकीच्या असून पोलिस प्रशासन व काही मुखबिरांनी कट रचून हे वातावरण निर्माण केले आहे,” असे म्हटले. त्यांनी नमूद केले की, नमाजानंतर नौमहला मशिदीतून शांततेत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आपली व्यथा मांडायची होती.
त्यांनी इशारा दिला की, “जर प्रशासनाने अडथळा आणला किंवा लोकांशी गैरवर्तन केले, तर त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. आमचा कार्यक्रम पूर्णतः शांततेचा आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा