25 C
Mumbai
Thursday, January 8, 2026
घरविशेषअहमदाबादमधील 'फायनल' ठरते आहे महागडी

अहमदाबादमधील ‘फायनल’ ठरते आहे महागडी

विमान प्रवासही महागला

Google News Follow

Related

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला असून भारतात रंगात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. रविवार, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये हा सामना होणार असून हा सामना प्रत्यक्ष मैदानात पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. क्रिकेटच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लोकांनी अहमदाबादला जायला सुरुवात केली आहे. यामुळेचं अहमदाबाद शहरातील हॉटेल्सचे दर गगनाला भिडले आहेत.

अंतिम सामन्याची तिकिट्स मिळवण्याची कसरत करत असताना चाहत्यांना आता हॉटेल्सचे दरही चिंतेत टाकू लागले आहे. या सामन्याची तिकिटं मिळवणं हे मोठं आव्हान आहे. दरम्यान, एरवी ५०० ते ७०० रुपये प्रतिदिन एवढं भाडं असणाऱ्या हॉटेल्सचे दरही तब्बल १० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर लक्झरी हॉटेलचे दर एका दिवसासाठी सुमारे एक लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

विशेष म्हणजे अहमदाबादला पोहोचणं देखील क्रिकेट चाहत्यांसाठी अवघड झालं आहे. दिल्ली ते अहमदाबाद विमान तिकिटाची किंमत १५ हजार रुपये एवढी झाली आहे. तर, मुंबईमधून अहमदाबादला जाणाऱ्या खासगी बसचे भाडे देखील महागले आहे. अर्थात, यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या लोकांना देखील मोठा फटका बसत आहे.

हे ही वाचा:

मुंबईतील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची वाहनांवर कारवाई

वर्षा गायकवाड यांचे आरोप खोडसाळ स्वरूपाचे

मुंबईकरांनी उडवले ५०० कोटींचे फटाके

दिवाळीत मुंबई विमानतळावर ये- जा करणाऱ्या विमानांची संख्या १ हजार पार!

क्रिकेट मॅचमुळे शहरातील हॉटेल्सचे दर वाढण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वी १५ ऑक्टोबर रोजी याचं स्पर्धेतील भारत- पाकिस्तान हा महत्त्वाचा सामना रंगला होता. या सामन्यावेळी देखील असाच प्रकार पहायला मिळाला होता. त्यातूनच धडा घेत अंतिम सामन्यासाठी कित्येक चाहत्यांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू केलं होतं.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा