25 C
Mumbai
Monday, September 16, 2024
घरक्राईमनामामुंबईतील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची वाहनांवर कारवाई

मुंबईतील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची वाहनांवर कारवाई

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ५८४ वाहनांचे मॉडीफाय केलेले सायलेन्सर जप्त

Google News Follow

Related

मुंबई वाहतूक पोलिसांनी वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई शहरासह उपनगरात विशेष मोहीम राबवत पीयूसी संबंधित २ हजार ९४६ वाहनांवर कारवाई केली मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली असून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या ५८४ वाहनांचे मॉडीफाय केलेले सायलेन्सर जप्त करण्यात आले आहे.

 

मुंबईतील ४१ वाहतूक विभागाकडून जानेवारी २०२३ ते १५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मॉडीफाईड केलेले एकूण ५८४ वाहनांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले असून, तसेच पीयूसी संपलेले आणि वायू प्रदूषण करणाऱ्या २०९४६ वाहनांवर मोटार वाहन अधिनियम कलम ११५ (७),१७७अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, तसेच फेरबदल केलेल्या २०५१ मोटार सायकलींवर ई-चलान कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

वर्षा गायकवाड यांचे आरोप खोडसाळ स्वरूपाचे

मुंबईकरांनी उडवले ५०० कोटींचे फटाके

दिवाळीत मुंबई विमानतळावर ये- जा करणाऱ्या विमानांची संख्या १ हजार पार!

फॅनला मारल्याप्रकरणी नाना पाटेकर यांची माफी!

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ०७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेबर २०२३ या कालावधीत विशेष मोहीम राबवून मॉडीफाईड केलेले एकूण २४४ सायलेन्सर जप्त करण्यात आले असून, पीयूसी अंतर्गत ५८६६ वाहनांवर मोटार वाहन अधिनियम कलम १९४ (फ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. ५१७ मॉडीफाईड सायलेंसरवर मोटार वाहन अधिनियम कलम १९८ अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून अवैधरित्या फेरबदल केलेल्या १२७ मोटार सायकलवर ई-चलान अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा