देशातील चार प्रतिष्ठित व्यक्तींना राज्यसभेसाठी नामांकित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, केरळचे नामवंत सामाजिक कार्यकर्ते सी. सदानंदन मास्टर, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि इतिहासकार मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी नामित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व नामांकित सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सलग पोस्ट करून प्रत्येक नामित सदस्याबद्दल माहिती दिली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. उज्ज्वल निकम यांच्याविषयी पंतप्रधान मोदी म्हणाले, “कायद्याच्या क्षेत्रात आणि संविधानप्रती असलेली त्यांची निष्ठा अनुकरणीय आहे. ते केवळ एक यशस्वी वकीलच नाहीत, तर अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांत न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत त्यांनी आघाडीची भूमिका बजावली आहे. त्यांच्या संपूर्ण विधिक कारकिर्दीत त्यांनी नेहमीच संविधानिक मूल्यांना बळकटी दिली आणि सामान्य नागरिकांना सन्मानाने न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले. त्यांना राज्यसभेसाठी नामित करण्यात आल्याचा अत्यंत आनंद आहे. त्यांच्या संसदीय कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”
हेही वाचा..
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ संकल्पनेचा विचार करण्यास तयार
डिझेल वाहून नेणाऱ्या मालगाडीला आग
हर्षवर्धन श्रृंगला यांच्या योगदानाचा उल्लेख करत मोदींनी लिहिले, “राजनयिक, बुद्धिजीवी आणि धोरणात्मक विचारवंत म्हणून त्यांनी अत्युत्तम कामगिरी बजावली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाला बळकट करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. भारताच्या G20 अध्यक्षतेदरम्यानही त्यांचा विशेष सहभाग होता. मला आनंद आहे की राष्ट्रपतींनी त्यांची राज्यसभेसाठी नामनियुक्ती केली आहे. त्यांचे अद्वितीय दृष्टिकोन नक्कीच संसदेला समृद्ध करेल.”
मीनाक्षी जैन यांच्याबद्दल मोदी म्हणाले, “त्या एक विदुषी, संशोधक आणि इतिहासकार म्हणून विशेष ओळखल्या जातात. शिक्षण, साहित्य, इतिहास आणि राज्यशास्त्र या क्षेत्रांतील त्यांच्या कार्याने शैक्षणिक वर्तुळात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या संसदीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा. सी. सदानंदन मास्टर यांचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “अन्यायासमोर न झुकणाऱ्या वृत्तीचे ते प्रतीक आहेत. हिंसा आणि भीतीच्या वातावरणानेसुद्धा त्यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पाला डगमगू दिले नाही. शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. युवकांना सक्षम बनवण्याची त्यांची बांधिलकी प्रेरणादायी आहे. त्यांची राज्यसभेसाठी नामनियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा.







