28 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरविशेषपंतप्रधान मोदी भाजपाच्या १ लाख बूथ प्रमुखांशी साधणार संवाद!

पंतप्रधान मोदी भाजपाच्या १ लाख बूथ प्रमुखांशी साधणार संवाद!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीच्या ‘माझा बूथ सर्वात मजबूत ‘ या उपक्रमाद्वारे उद्या (१६ नोव्हेंबर) राज्यातील पक्षाच्या १ लाख बूथ प्रमुखांशी नमो ॲपच्या माध्यमातून आणि ऑनलाइन संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे बूथ पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होईल आणि पक्षाच्या विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पडेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

भाजपा नेते बावनकुळे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांचा हा विशेष संवाद कार्यक्रम भारतीय जनता पार्टी च्या विधानसभा निवडणूक तयारीचा महत्वाचा भाग आहे. या विशेष संवादामुळे बूथच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळणार असून नव्या जोमाने ते कामाला लागतील असा विश्वास मला आहे. पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी एकजुटीने मतदानादिवशी काम करणे आणि बूथ स्तरावर पक्षाची पकड मजबूत करणे हे या अभियानामागचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा :

श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब बिष्णोईच्या हिटलिस्टवर!

मेट्रो- ३ च्या बीकेसी स्टेशनला आग; मेट्रोच्या फेऱ्यांना स्थगिती

“कोमट” पाण्यातील गॅरंटीच्या “चकल्या”

काँग्रेस, कन्हैय्या कुमार सारख्या नेत्यांची महिलांबाबतची मानसिकता समोर येते!

बूथ प्रमुख आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा निवडणुकीच्या व्यवस्थापनातील कणा असून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. म्हणूनच कायमच पक्षाने कार्यकर्त्यांना महत्व दिले. या संवादाच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेतील त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या देखील स्पष्ट केल्या जातील असे बावनकुळे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपाला विजयी करण्यासाठी आज प्रत्येक कार्यकर्ता झटत आहे. जनतेपर्यंत पक्षाच्या जाहीरनाम्यातील मुद्दे आणि कल्याणकारी योजनांचे लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे, ज्याच्याकडे बूथ पातळीवर नि:स्वार्थ भावनेने काम करणारे कार्यकर्ते आहेत.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा