27.1 C
Mumbai
Friday, July 11, 2025
घरविशेषपंतप्रधान मोदींनी 'लखपती दिदीं'शी साधला संवाद !

पंतप्रधान मोदींनी ‘लखपती दिदीं’शी साधला संवाद !

देशातील निवडक अशा ८० लखपती दीदींची पंतप्रधानांनी ऐकली यशोगाथा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘लखपती दीदी’ सोहळ्यासाठी जळगावात दाखल झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदींचे आगमन होताच महिलांनी ओवाळणी करून त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी देशभरातून आलेल्या लखपती दिदिंशी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. वेगवेगळ्या राज्यामधून उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गटाचं उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला बचत गटांची निवड करण्यात आली होती आणि या महिला बचत गटाच्या यशोगाथा स्वतः पंतप्रधान  मोदींनी जाणून घेतली.

“लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला.”अशी भावना लखपती दीदींनी यावेळी व्यक्त केली.

हे ही वाचा :

आंदोलनात ‘सर तन से जुदा’ घोषणा देणाऱ्या ३०० जणांवर गुन्हा

विकसित भारताच्या वाटचालीत मातृशक्तीचा मोठा हातभार; लखपती दीदींना मोदींचे अभिवादन !

‘लखपती दीदी’ संमेलनासाठी माता भगिनींचा जमला महासागर !

पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक; ९६० लोकल फेऱ्यांवर होणार परिणाम

येथील प्राइम इंडस्ट्रियल पार्क मैदानावर झालेल्या लखपती दिदी संमेलनापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक अशा ८० लखपती दीदींशी संवाद साधला. या लखपती दिदी संवाद कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या राज्यांतील बॅंक सखी दिदी, ड्रोन दीदी, पशु दिदी, कृषी दिदी म्हणून नावारूपाला येऊन लखपती झालेल्या महिला उपस्थित होत्या.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आदी मंत्री उपस्थित होते.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा