पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून तमिळनाडूच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते ४८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करणार आहेत. ब्रिटन आणि मालदीवच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी थेट तमिळनाडूत दाखल होणार आहेत. हा त्यांचा दोन दिवसांचा दौरा आहे. शनिवारी पंतप्रधान मोदी तूतीकोरिन येथे विविध ऐतिहासिक प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि त्यांना राष्ट्राला समर्पित करतील. ते सुमारे ४५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या तूतीकोरिन विमानतळाच्या नव्या टर्मिनल भवनाचे उद्घाटन करतील.
पंतप्रधान रणनीतिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करतील. या प्रकल्पांत एनएच-१३८ तूतीकोरिन बंदर मार्ग आणि विक्रवंडी-तंजावूर कॉरिडॉर अंतर्गत एनएच-३६ चा काही भाग चौपदरीकरण यांचा समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांवर एकूण २५०० कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे. मोदी वी. ओ. चिदंबरनार बंदरावर सुमारे २८५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या ६.९६ एमएमटीपीए क्षमतेच्या तिसऱ्या उत्तर मालवाहतूक बर्थचे उद्घाटन करतील.
हेही वाचा..
लॉ कॉलेज बलात्कार प्रकरणी फॉरेन्सिक अहवालांतून आरोपींची पुष्टी
झारखंडमध्ये चकमकीत तीन उग्रवादी ठार
गुगल मॅपने दिला धोका, महिलेसह चारचाकी थेट खाडीत कोसळली!
मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्याचे कळताच मुलीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न!
पंतप्रधान तीन प्रमुख रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण करतील. यामध्ये: तिरुवनंतपुरम-कन्याकुमारी प्रकल्पाअंतर्गत २१ कि.मी. नागरकोइल टाउन ते कन्याकुमारी दरम्यानचे दुहेरीकरण. अरलवयमोझी-नागरकोइल जंक्शन (१२.८७ कि.मी.) आणि तिरुनेलवेली-मेलाप्पलायम (३.६ कि.मी.) या खंडांचे दुहेरीकरण. ९० कि.मी. लांब मदुरै-बोदिनायक्कनूर रेल्वेमार्गाचा विद्युतीकरण प्रकल्प. हे प्रकल्प पूर्ण करून ते राष्ट्राला समर्पित केले जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या वीज पारेषण प्रकल्पाचा शिलान्यास करतील. सुमारे ५५० कोटी रुपयांच्या खर्चाने उभारला जाणारा हा प्रकल्प आंतरराज्यीय पारेषण प्रणाली (ISTC) अंतर्गत असेल. या प्रकल्पामध्ये कुडनकुलमहून तूतीकोरिन-२ GIS सबस्टेशनपर्यंत ४०० केव्ही (क्वाड) डबल-सर्किट ट्रान्समिशन लाईन आणि संबंधित टर्मिनल उपकरणांचा समावेश आहे. २७ जुलै रोजी पंतप्रधान मोदी तिरुचिरापल्लीला जातील, जिथे ते गंगईकोंडा चोलपुरम मंदिरात दुपारी १२ वाजता ‘आदि तिरुवथिरई महोत्सव’ आणि महान चोल सम्राट ‘राजेंद्र चोल पहिला’ यांच्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या उत्सवात सहभागी होतील. राजेंद्र चोल पहिल्यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान एक स्मारक नाणेही जारी करतील.







