29 C
Mumbai
Thursday, March 12, 2026
घरविशेषखादी उत्पादन, वोकल फॉर लोकलला प्रोत्साहन द्या

खादी उत्पादन, वोकल फॉर लोकलला प्रोत्साहन द्या

मन की बातमध्ये पंतप्रधानांचे आवाहन

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना २ ऑक्टोबरला खादी उत्पादन खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या १२६ व्या भागात संबोधित करताना त्यांनी म्हटले की, २ ऑक्टोबरला एखादे ना एखादे खादी उत्पादन नक्की खरेदी करा. अभिमानाने सांगा – हे स्वदेशी आहे. आणि ते सोशल मीडियावर ‘वोकल फॉर लोकल’ या हॅशटॅगसह शेअरही करा. पंतप्रधान मोदी म्हणाले, “२ ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. गांधीजींनी नेहमी स्वदेशी स्वीकारण्यावर भर दिला आणि त्यामध्ये खादीला सर्वात महत्त्वाचे स्थान दिले. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर खादीची चमक काहीशी कमी झाली होती, पण मागील ११ वर्षांत खादीबद्दल देशातील लोकांचे आकर्षण खूप वाढले आहे. गेल्या काही वर्षांत खादीच्या विक्रीत मोठी वाढ दिसून आली आहे.”

ते पुढे म्हणाले की, खादीप्रमाणेच आपल्या हॅंडलूम आणि हॅंडीक्राफ्ट क्षेत्रातही बरेच बदल घडताना दिसत आहेत. परंपरा आणि नवनिर्मिती (इनोव्हेशन) यांना जर एकत्र जोडले, तर आश्चर्यकारक परिणाम दिसू शकतात, याची अनेक उदाहरणे देशभरात दिसत आहेत. या प्रसंगी पंतप्रधान मोदींनी झारखंडमधील आशीष सत्यव्रत साहू यांची कहाणी सांगितली. ते म्हणाले, “सत्यव्रत साहू यांनी ‘जोहारग्राम’ या ब्रँडच्या माध्यमातून आदिवासी विणकाम व वस्त्रप्रकार जागतिक रॅम्पपर्यंत पोहोचवले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज झारखंडची सांस्कृतिक परंपरा इतर देशांतील लोकांनाही परिचित होत आहे.”

हेही वाचा..

व्यापार वादाच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या पूजा मंडपात राक्षसाच्या रूपात ‘डोनाल्ड ट्रम्प’

१७ विद्यार्थ्यांशी विनयभंग करणाऱ्या बाबा चैतन्यनंद सरस्वतीला आग्रा येथून अटक!

बॉक्सर मेरी कोमचे घर दरोडेखोरांनी फोडले!

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा: एनडीआरएफ सज्ज!

तसेच, तमिळनाडूतील ‘याझ नेचुरल्स’ या उपक्रमाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, अशोक जगदीशन आणि प्रेम सेल्वाराज यांनी कॉर्पोरेट नोकरी सोडून गवत व केळीच्या तंतूपासून फायबर आणि योगा मॅट तयार केले. त्यांनी हर्बल रंगांनी वस्त्रांना रंग दिला आणि २०० कुटुंबांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील स्वीटी कुमारी यांच्या ‘संकल्प क्रिएशन’चा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांनी मिथिला पेंटिंगला उपजीविकेचे साधन बनवले. त्यांच्या सोबत ५०० हून अधिक ग्रामीण महिला जोडून आत्मनिर्भर बनत आहेत. पंतप्रधानांनी सांगितले, “ही यशोगाथा शिकवते की आपल्या परंपरांमध्ये उत्पन्नाची असंख्य साधने दडलेली आहेत. जर इरादा पक्का असेल, तर यश दूर नाही.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा