अमेरिकेतून हद्दपार झालेल्यांच्या यादीत पंजाबचा माणूस, अद्याप परतलेला नाही; कुटुंबाशी संपर्क नाही!

आतापर्यंत ३३२ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरित देशात परतले 

अमेरिकेतून हद्दपार झालेल्यांच्या यादीत पंजाबचा माणूस, अद्याप परतलेला नाही; कुटुंबाशी संपर्क नाही!

अमेरिकेतून ५ फेब्रुवारीपासून बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांच्या तीन तुकड्या देशात आल्या आहेत. मात्र, पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी नवदीप सिंग, जो अमेरिकेतून हद्दपार झालेल्यांच्या यादीत होता, तो अद्याप घरी पोहोचलेला नाही.

नवदीपने बेकादेशीर ‘डंकी’ मार्गाने आठ महिन्यात दोनदा अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोनही वेळा त्याला अपयश आले, यानंतर त्याला भारतात पाठविण्याची प्रक्रिया सुरु झाली. नवदीप सिंगचे नाव दोनदा हद्दपारीच्या यादीत आले. मात्र, अद्याप तो भारतात दाखल झाला नसून कुटुंबाशी कोणताही संपर्क झालेला नाही.

काश्मीर सिंग हे त्याचे वडील असून तारनवाला गावात त्यांचे मिठाईचे दुकान आहे. काश्मीर सिंग यांनी सांगितले की ते १५ फेब्रुवारी रोजी आपल्या मुलाला घेण्यासाठी अमृतसरला गेले होते. ते पुढे म्हणाले, “आम्ही विमानतळावर त्याची वाट पाहत होतो पण जेव्हा नवदीपचा मित्र बाहेर आला तेव्हा त्याने आम्हाला सांगितले की तो विमानात नाही. कारण दिले गेले की तो आजारी होता आणि त्याला ताप आला होता. आमचा मुलगा परतला नाही याची आम्हाला खूप काळजी आहे, आम्हाला त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही,”. दरम्यान, आतापर्यंत ३३२ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरित देशात परतले आहेत.

हे ही वाचा : 

विजेंदर गुप्ता विधानसभेचे नवे अध्यक्ष होणार

महाकुंभ: महिलांच्या स्नानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, पोलिसांकडून गुन्हा दाखल!

‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आंदोलन

बांगलादेशी घुसखोरांविरोधात हिंदू जनजागृती समितीकडून दादरमध्ये मूक निदर्शन

नवदीपच्या आईने असेही म्हटले की, आम्ही विमानतळावर आमच्या मुलाला शोधत राहिलो पण त्याच्या मित्राने आम्हाला सांगितले की त्याची तब्येत ठीक नसल्याने त्याला विमानातून काढून टाकण्यात आले आहे”. आमचा त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही आणि आतापर्यंत कोणीही आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही. आम्ही आमच्या मुलाच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना करत आहोत,” त्या पुढे म्हणाल्या.

गेल्या ८ महिन्यांत त्याला दोनदा अमेरिकेला पाठवण्यासाठी आम्ही सुमारे ५५ लाख रुपये खर्च केले. पण दोन्ही वेळा नशिबाने त्याला साथ दिली नाही. नवदीप बेकायदेशीर स्थलांतरितांच्या दुसऱ्या तुकडीसोबत भारतात येणार होता. मात्र, अद्याप तो भारतात आलेला नाही.

Exit mobile version