31 C
Mumbai
Sunday, March 16, 2025
घरविशेषमहाकुंभ: महिलांच्या स्नानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, पोलिसांकडून गुन्हा दाखल!

महाकुंभ: महिलांच्या स्नानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, पोलिसांकडून गुन्हा दाखल!

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पुढील कारवाई सुरु

Google News Follow

Related

प्रयागराजमधील महाकुंभाचा २६ फेब्रुवारी रोजी शेवट होणार आहे. आतापर्यंत करोडो भाविकांनी मेळ्यात सहभागी होत संगमात स्नान केले आहे, करत आहेत. तथापि, दरम्यान, एका लज्जास्पद कृत्याची बातमी देखील समोर येत आहे. खरंतर, महाकुंभात स्नान करण्यासाठी आलेल्या महिलांचे स्नान करताना आणि कपडे बदलतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा एक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची दखल घेत यूपी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये पहिला @neha१२२४८७२०२४ या इन्स्टाग्राम अकाउंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर इन्स्टाग्राम अकाउंटवरून, कुंभमेळ्यात आलेल्या महिला भाविकांचे स्नान करताना आणि कपडे बदलतानाचे अश्लील व्हिडिओ पोस्ट केले जात होते. त्यामुळे सदर इन्स्टाग्राम अकाउंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ते चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी मेटा कंपनीकडून माहिती मागवली जात आहे.

दुसऱ्या प्रकरणात, ‘सीसीटीव्ही चॅनल ११’ (cctv CHANNEL ११) नावाच्या टेलिग्राम चॅनेलविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे, जिथे असे व्हिडिओ वेगवेगळ्या रकमेला विकले जात होते असा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्यासाठी पुढील कारवाई सुरु आहे.

हे ही वाचा : 

‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आंदोलन

बांगलादेशी घुसखोरांविरोधात हिंदू जनजागृती समितीकडून दादरमध्ये मूक निदर्शन

कोण आहेत रेखा गुप्ता ?

महाकुंभ : पाकिस्तानकडून बनावट व्हिडिओ शेअर केल्याबद्दल एफआयआर दाखल

सोशल मिडीयावर शेअर करण्यात आलेल्या काही पोस्ट टेलिग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना पूर्ण व्हिडिओ खरेदी करण्यासाठी आमिष दाखवण्यासाठी टीझर म्हणून वापरल्या जात होत्या. असे व्हिडिओ शेअर करण्यासाठी #mahakumbh२०२५, #gangasnan आणि #prayagrajkumbh सारखे हॅशटॅग वापरून अश्लील सामग्रीचा प्रचार करणारे फेसबुक पेज आढळले. “गंगा रिव्हर ओपन बाथिंग ग्रुप” आणि “हिडन बाथ व्हिडिओज ग्रुप” सारख्या नावांचे अनेक टेलिग्राम चॅनेल देखील आढळून आले आहेत. हे प्रकरण समोर येताच युपी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा