30.8 C
Mumbai
Thursday, June 11, 2026
घरविशेष‘डॉन ३’च्या वादानंतर रणवीर सिंग विरोधात असहकार आदेश; काय आहे प्रकरण?

‘डॉन ३’च्या वादानंतर रणवीर सिंग विरोधात असहकार आदेश; काय आहे प्रकरण?

FWICE च्या निर्णयानंतर रणवीर सिंग अडचणीत

Google News Follow

Related

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग आणि दिग्दर्शक- निर्माता फरहान अख्तर यांच्या बहुचर्चित डॉन-३ चित्रपटावरील वाद आता गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. चित्रपटसृष्टीतील प्रमुख कामगार आणि तंत्रज्ञ संघटना Federation of Western India Cine Employees (FWICE) ने रणवीर सिंग याच्याविरोधात असहकार निर्देश (Non-Cooperation Directive) जारी केला आहे. यामुळे फेडरेशनच्या सदस्यांना रणवीरसोबत कोणत्याही प्रकल्पात काम न करण्याचे आवाहन करण्यात आले असून, याकडे उद्योगक्षेत्रातील एका प्रकारच्या बंदीच्या रूपात पाहिले जात आहे.

दरम्यान, निर्माते फरहान अख्तर आणि रितेश सिध्वानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने प्री-प्रोडक्शनमधील कथित ४५ कोटी रुपयांच्या नुकसानीची भरपाई रणवीर सिंग याच्याकडे मागितली आहे. फेडरेशनच्या निर्णयानंतर रणवीर सिंग याने अधिकृत निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, रणवीर यांना चित्रपटसृष्टी आणि ‘डॉन’ फ्रँचायझीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीबद्दल अत्यंत आदर आहे. निवेदनात म्हटले आहे, “डॉन ३ संदर्भातील अलीकडील घडामोडींवर रणवीर यांनी जाणीवपूर्वक मौन बाळगले. त्यांचा विश्वास आहे की व्यावसायिक चर्चा आणि वैयक्तिक संबंध हे सन्मान, परिपक्वता आणि परस्पर आदराने हाताळले गेले पाहिजेत.” तसेच, “वेगवेगळ्या अफवा आणि चर्चा समोर आल्या असल्या तरी रणवीर यांनी सार्वजनिकरित्या त्यावर प्रतिक्रिया देणे आवश्यक मानले नाही. त्यांचे पूर्ण लक्ष सध्या त्यांच्या आगामी प्रकल्पांवर केंद्रित आहे. ते फ्रँचायझीशी संबंधित सर्वांना शुभेच्छा देतात,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

वादाची सुरुवात कशी झाली?

FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी सांगितले की, ११ एप्रिल रोजी फरहान अख्तर यांनी Indian Film and Television Directors Association (IFTDA) मार्फत फेडरेशनकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, रणवीर सिंग याने एक्सेल एंटरटेनमेंटसोबत तीन चित्रपटांचा करार केला होता. मात्र, शूटिंग सुरू होण्याच्या अवघ्या तीन आठवडे आधी त्याने अचानक प्रकल्पातून माघार घेतली. फेडरेशनने २२ एप्रिल, ३० एप्रिल आणि १३ मे रोजी रणवीर याला सलग तीन नोटिसा पाठवल्या. मात्र, रणवीर याच्या टीमने थेट उत्तर देण्याऐवजी फेडरेशनच्या अधिकारक्षेत्रावरच प्रश्न उपस्थित केले.

FWICE चे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी म्हटले की, हा वाद केवळ एखाद्या स्टार आणि निर्मात्यामधील नाही. मोठे चित्रपट अचानक थांबल्यास स्पॉट बॉय, ज्युनिअर आर्टिस्ट, तंत्रज्ञ आणि दैनंदिन मजुरीवर काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या रोजगारावर परिणाम होतो. अशोक पंडित यांनी इशारा देताना म्हटले, “आम्ही रणवीर सिंग याच्या स्टारडमचा आदर करतो. पण कोणताही सुपरस्टार उद्योगाच्या नियमांपेक्षा मोठा असू शकत नाही. जोपर्यंत रणवीर स्वतः समोर येऊन हा प्रश्न सोडवत नाहीत, तोपर्यंत आमचे चार लाखांहून अधिक सदस्य त्यांच्या कोणत्याही चित्रपट, जाहिरात किंवा प्रकल्पात काम करणार नाहीत.”

हे ही वाचा:

सिद्धरामय्या- डीके शिवकुमार दिल्लीत; कर्नाटक मंत्रिमंडळात होणार फेरबदल?

पाकिस्तानातील सत्ता लष्कराच्या हाती? ट्रम्प यांच्या पोस्टने वेधले लक्ष

अमेरिकेकडून IRGC च्या नौका आणि क्षेपणास्त्र तळांवर हल्ले

सीएनजी दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ

मतभेदांना सुरुवात कधी झाली?

चित्रपटसृष्टीतील चर्चेनुसार, शाहरुख खान याच्यानंतर २०२३ मध्ये रणवीर सिंग याला ‘डॉन ३’ चा नवा चेहरा म्हणून सादर करण्यात आले होते. मात्र, डिसेंबर २०२५ मध्ये रणवीर याने धुरंधरच्या यशानंतर ‘डॉन ३’च्या पटकथेत काही बदल सुचवले. निर्मात्यांनी ते बदल मान्य न केल्याने रणवीर याने चित्रपट सोडल्याची चर्चा आहे. सध्या Producers Guild of India ने दोन्ही पक्षांना न्यायालयीन मार्गाऐवजी परस्पर सामंजस्याने तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, रणवीर याने स्वतः पुढे येऊन आपली बाजू मांडल्याशिवाय असहकार आदेश मागे घेण्यात येणार नसल्याचे FWICE ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील या गाजलेल्या वादाकडे संपूर्ण उद्योगाचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
313,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा