28.2 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरविशेषआर. माधवन, हरमनप्रीत कौरला पद्मश्री; धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण

आर. माधवन, हरमनप्रीत कौरला पद्मश्री; धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण

२०२६ सालच्या पद्म पुरस्कारांच्या पहिल्या टप्प्यातील पुरस्कारांचे वितरण

Google News Follow

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवार, २५ मे रोजी राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे २०२६ सालच्या पद्म पुरस्कारांच्या पहिल्या टप्प्यातील पुरस्कारांचे वितरण केले. केंद्र सरकारने २५ जानेवारी रोजी १३१ पद्म पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६६ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले असून उर्वरित विजेत्यांना दुसऱ्या टप्प्यात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यात राष्ट्रपतींनी दोन पद्मविभूषण, सहा पद्मभूषण आणि ५८ पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये अभिनेते आर माधवन, क्रिकेटपटू रोहित शर्मा, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, हॉकीपटू सविता पुनिया आणि पॅरा-अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिलांचा समावेश असून १६ मान्यवरांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

दिवंगत अभिनेते धर्मेंद्र, केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस यांच्यासह पाच जणांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आले. तर प्रसिद्ध गायिका अलका याग्निक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्यासह १३ मान्यवरांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान केला. त्यांच्या वतीने अभिनेत्री आणि पत्नी हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला.

हे ही वाचा:

गुलमर्गमधील गोंडोला केबल कारसेवा अचानक पडली बंद आणि…

बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीशी संबंधित दहशतवादी निधी प्रकरणात छापेमारी

एआयएडीएमकेच्या तीन आमदारांचा राजीनामा; टीव्हीके पक्षात केला प्रवेश

जागतिक स्तरावर तेलाच्या किमती घसरल्या तरी भारतात इंधन दरवाढ का?

बिहारमधील मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार विजेते विश्व बंधू यांच्या पत्नी इंदू देवी यांनी पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना सरकारचे आभार मानले. “हा सन्मान मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. संपूर्ण कुटुंबासाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे,” असे त्या म्हणाल्या. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा