34 C
Mumbai
Tuesday, May 26, 2026
घरविशेषराजस्थानमधील सरकारी रुग्णालयांत पाच गर्भवती महिलांचा मृत्यू

राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांत पाच गर्भवती महिलांचा मृत्यू

गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरलेल्या ऑक्सिटोसिनच्या बॅचवर राज्यव्यापी बंदी

Google News Follow

Related

राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांना पुरवण्यात आलेल्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या एका बॅचची गुणवत्ता चाचणी अपयशी ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर राज्याच्या औषध नियंत्रण विभागाने या इंजेक्शनच्या वापरावर आणि विक्रीवर तात्काळ बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, याच बॅचचा वापर कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयातही करण्यात आला होता, जिथे अलीकडेच अनेक गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या महिलांचा मृत्यू झाला आहे.

ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर सामान्यतः प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्राव नियंत्रित करण्यासाठी केला जातो. मात्र प्रयोगशाळेतील तपासणीत संबंधित इंजेक्शनमध्ये रक्त गोठवण्यासाठी आवश्यक घटक पुरेशा प्रमाणात नसल्याचे आढळून आले. प्राथमिक चौकशीत ही औषधे निकृष्ट दर्जाची किंवा बनावट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. माहितीनुसार, अमृतसरस्थित जॅक्सन लॅबोरेटरीज निर्मित या ऑक्सिटोसिन बॅचचा वापर कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयात करण्यात आला होता. अलीकडील काळात येथे सिझेरियन (C-Section) आणि गर्भाशयाशी संबंधित शस्त्रक्रियांनंतर अनेक महिलांची प्रकृती अचानक बिघडल्याची नोंद झाली होती.

वृत्तांनुसार, सरकारी रुग्णालयांमध्ये किमान पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. शस्त्रक्रियेनंतर ८ ते १२ तासांच्या आत रुग्णांचा रक्तदाब झपाट्याने घसरला, प्लेटलेट्सची संख्या कमी झाली आणि काही प्रकरणांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणेही दिसून आली. तपास यंत्रणा रुग्णालयांमध्ये वापरण्यात आलेल्या काही IV फ्लुइडच्या बॅचचीही चौकशी करत आहेत. या बॅचेसदेखील गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरल्या असाव्यात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राजस्थान सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच जयपूरच्या SMS मेडिकल कॉलेजमधील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक कोटा येथे पाठवण्यात आले आहे. हे पथक रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच मृत्यूंची संभाव्य कारणेही तपासत आहे.

रुग्णालय प्रशासनाने मात्र मृत्यूंचे नेमके कारण अद्याप निश्चित झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. चौकशी समितीच्या अंतिम अहवालानंतरच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. राजस्थानचे औषध नियंत्रक अजय पाठक यांनी सांगितले की, ऑक्सिटोसिन इंजेक्शनचे नमुने गुणवत्ता चाचणीत नापास ठरल्यानंतर कोटा रुग्णालयातील संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच राज्यभर या औषधाच्या विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

१५० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात अनिल अंबानी समूहावर फसवणुकीचा नवा गुन्हा

अणुकरारापूर्वी इराण समृद्ध युरेनियम चीनकडे सोपवणार?

सिद्धरामय्या- डीके शिवकुमार दिल्लीत; कर्नाटक मंत्रिमंडळात होणार फेरबदल?

पाकिस्तानातील सत्ता लष्कराच्या हाती? ट्रम्प यांच्या पोस्टने वेधले लक्ष

राजस्थानमध्ये सध्या संशयित बनावट आणि निकृष्ट औषधांविरोधात व्यापक मोहीम सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या दहा दिवसांत राज्यभरातून गोळा करण्यात आलेल्या ११ औषधांच्या नमुन्यांपैकी अनेक नमुने गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले आहेत. प्राथमिक तपासणीत ताप, ऍलर्जी, पोटातील संसर्ग, आपत्कालीन वेदना व्यवस्थापन आणि अँटिबायोटिक औषधांसह अनेक औषधे निकृष्ट किंवा बनावट असल्याचे आढळून आले आहे. ही औषधे राजस्थान, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विविध कंपन्यांनी तयार केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तपास यंत्रणा औषध पुरवठा साखळी, रुग्णालयांमध्ये वापरण्यात आलेल्या बॅचेस आणि संबंधित औषध उत्पादक कंपन्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
309,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा