बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येमुळे नागरिक आणि देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना देशासह राज्यात त्यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्या नागरिकांना हुसकावून लावण्यासाठी म्हणून पोलिसांच्या माध्यमातून ही कारवाई केली जात आहे. तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून या विरोधात आवाज उठवला जात आहे. जागोजागी मोर्चे काढून, निदर्शेने करून जनजागृती केली जात आहे. अशातच मुंबईत हिंदू जनजागृती समितीकडून मूक निदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
बांगलादेशी घुसखोरांना हाकला अशी मागणी लावून धरण्यासाठी म्हणून हिंदू जनजागृती समितीकडून मुंबईमधील दादरमध्ये मूक निदर्शन करण्यात येणार आहे. गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हे निदर्शन करण्यात येणार आहे. या मूक निदर्शनाला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी हजेरी लावावी असे आवाहन करण्यात आले आहे. बांगलादेशी मुक्त भारत, बांगलादेशी घुसखोरांना सहाय्य करणाऱ्यांवर कारवाई करा, बांगलादेशी हटवा; देश वाचवा अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत.
- दिनांक: गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५
- वेळ: सायं. ६ वाजता
- पत्ता: आकाश स्वीट कॉर्नर ते सुविधा शोरूमपर्यंत, दादर रेल्वे स्थानकाजवळ, दादर (प.), मुंबई