राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक श्री. राधाकृष्ण आत्माराम भागीया यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी अनेक वर्षे संघाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या.
समाजातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा अत्यंत सक्रिय सहभाग होता. त्यांनी संघाच्या मुलुंड परिसरात सह संघचालकाचे दायित्व सांभाळले होते. त्याचप्रमाणे सिंधी समाजाच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.
हेही वाचा..
षष्ठ्यब्दीपूर्ति निमित्त सुनील देवधर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!
… म्हणून काँग्रेस नेत्याला ठोठावला १.२४ अब्ज रुपयांचा दंड!
राज कुंद्रावर ईडीकडून १५० कोटींच्या बिटकॉइन घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल
सूरत ते बिलीमोरा बुलेट ट्रेन धावणार लवकरच
सिंधी समाज विशेषांक व इतर विशेषांकांसाठी ते नेहमी प्रयत्नशील असत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत संघाचा विचार पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. न्यूज डंकाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.







