भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या त्या विधानावर जोरदार टीका केली आहे, ज्यात त्यांनी निवडणूक आयोगावर ‘मतं चोरण्याचा’ आरोप केला होता. तरुण चुग म्हणाले की, “राहुल गांधी वारंवार आपली मानसिक कुंठा व्यक्त करत लोकशाहीला कमजोर करत आहेत आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर शंका घेत आहेत.”
गुरुवारी आयएएनएसशी बोलताना त्यांनी म्हटलं की, “राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष निवडणूक आयोग आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) वर खोटे आरोप करत आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यांवर फोडत आहेत. राहुल गांधींचं ‘मतं चोरी’चं विधान ही काँग्रेसच्या मानसिक कुंठेची आणि अपयशी नेतृत्वाची साक्ष आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की, बिहारमध्ये ‘इंडी अलायन्स’च्या संभाव्य पराभवामुळे राहुल गांधी अशा प्रकारचे आरोप करत आहेत, जेणेकरून पराभवाचं खरं कारण लपवता येईल. बिहारची जनता पुन्हा ‘जंगलराज’ स्वीकारणार नाही आणि त्यांना उत्तर देईल.
हेही वाचा..
भारतीय लष्कराला लवकरच मिळणार ७,००० नवीन AK-203 रायफल्स, उत्पादन पूर्णपणे देशी
मुंबईत ईडीचे छापे: छंगूर बाबा संबंधित कथित धर्मांतर रॅकेट प्रकरणी चौकशी सुरू
पाकिस्तानात पावसामुळे ६० जणांचा मृत्यू
ईडीकडून रॉबर्ट वाड्रासह ११ जणांविरोधात आरोपपत्र
‘वोटर लिस्ट व्हेरिफिकेशन’ प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी असतात, त्यामुळे अशा प्रकारचे आरोप निंदनीय आहेत. राहुल गांधी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यातील वादावर बोलताना तरुण चुग म्हणाले की, “राहुल गांधी यांनी काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्या पत्नीचे पाकिस्तानशी असलेले कथित संबंध यावरही भूमिका स्पष्ट करायला हवी. त्यांचं मौन हेच त्यांच्या पाकिस्तानप्रेमाचं स्पष्ट लक्षण आहे.”
ते पुढे म्हणाले, “राहुल गांधी स्वतः जामिनावर बाहेर आहेत आणि ते एका निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याविषयी ज्या प्रकारे वक्तव्य करत आहेत, त्यामुळे काँग्रेसची मानसिकता सत्ता असो वा विरोधात, नेहमीच अलोकशाही राहिलेली आहे. ते मुख्यमंत्रीला जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहेत, जी मानसिक असंतुलनाचं उदाहरण आहे. तरुण चुग यांनी सांगितले की, “हिमंता बिस्वा सरमा हे जनतेने निवडून दिलेले मुख्यमंत्री आहेत आणि आसामची जनता त्यांच्यावर प्रेम करते. राहुल गांधींचे पाप आसामची जनता विसरणार नाही.”
बंगालींविषयी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानावर बोलताना चुग म्हणाले की, “त्या मुस्लिम लीगचं नवीन रूप बनल्या आहेत. त्यांना ‘आधुनिक जिना’ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या घुसखोरांचे समर्थन करत आहेत आणि हे त्यांच्या वोट बँकेसाठी केलेलं क्षुद्र राजकारण आहे. त्या देशभरात जिहादी विचारसरणी आणि मुस्लिम लीगचा अजेंडा पुढे नेत आहेत. काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “पंतप्रधान मोदींनी आधीच स्पष्ट केलं आहे की योग्य वेळ आल्यावर विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल. पूर्वीच्या सरकारांवर टीका करताना त्यांनी सांगितलं की, आता काश्मीरमध्ये निवडणुकीचं बॉयकॉट न होता मोठ्या प्रमाणावर मतदान होत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तेथे खरी लोकशाही प्रस्थापित झाली आहे.”







