28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरविशेषरेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल होणार

रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल होणार

Google News Follow

भारतीय रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बदल करत आहे, जे पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांना संधी देण्यासाठी केले आहेत.

आगामी जुलै महिन्यापासून तात्काळ तिकीट ऑनलाइन बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात येणार आहे. याशिवाय, आरक्षण काउंटरवर आणि अधिकृत एजंट्सकडून तिकीट बुक करताना ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) प्रमाणीकरण लागू होईल.

एजंट्सना तत्काळ बुकिंगच्या सुरुवातीच्या 30 मिनिटांत बुकिंग करण्यावर बंदी असेल, जेणेकरून सामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्याची संधी वाढेल.

ऑनलाइन तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक असेल. जुलै 2025 पासून आयआरटीसीच्या वेबसाइट आणि मोबाईल ऍपवर तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार नंबर लिंक करणे आणि यशस्वी प्रमाणीकरण करणे अनिवार्य होणार आहे.

येत्या 15 जुलै पासून तिकीट बुक करताना ऑनलाइन, काउंटरवर तसेच अधिकृत एजंट्सकडून ओटीपी प्रमाणीकरण करणे आवश्यक होईल. अधिकृत एजंट्सना तत्काळ बुकिंगच्या पहिल्या 30 मिनिटांत तिकीट बुक करण्यास मनाई असेल.

रेल्वेच्या एसी-कोचच्या तिकीटांसाठी सकाळी 10 ते 10.30 यावेळेत आणि स्लिपर क्लाससाठी सकाळी 11 ते 11.30 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.

तत्काळ तिकीटासाठी इच्छुक ग्राहकांना आयआरटीसी युजर प्रोफाईलमध्ये आधार क्रमांक लिंक करून त्याचे प्रमाणीकरण करावे लागेल. तसेच तिकीट बुकिंगचा ओटिपी रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा