28.3 C
Mumbai
Tuesday, July 21, 2026
घरविशेषदेशभर पुन्हा बरसणार पाऊस; अनेक राज्यांत मुसळधार सरी

देशभर पुन्हा बरसणार पाऊस; अनेक राज्यांत मुसळधार सरी

हवामान विभागाचा अंदाज

Google News Follow

Related

देशभरात गेल्या काही आठवड्यांपासून मंदावलेला नैऋत्य मान्सून आता पुन्हा जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, आठवड्याच्या सुरुवातीपासून ईशान्य, पूर्व, मध्य आणि उत्तर भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून अनेक भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे उष्णता आणि दमट हवामानाने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Area) तयार होत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पूर्व किनारपट्टीमार्गे मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता असून, त्यामुळे मान्सूनचा द्रोणीय पट्टा (Monsoon Trough) पुन्हा आपल्या सामान्य स्थितीत येईल. यामुळे बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात ओलावा देशाच्या अंतर्गत भागात पोहोचेल आणि व्यापक पावसाला सुरुवात होईल.

यंदाच्या जुलै महिन्यात देशात ‘ब्रेक मान्सून’ परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात मान्सूनचा द्रोणीय पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने डोंगराळ भागात जोरदार पाऊस झाला, मात्र उत्तर, मध्य आणि मैदानी भागांमध्ये पावसाने मोठी विश्रांती घेतली. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली कमी प्रमाणात तयार झाली आणि अरबी समुद्रातून येणारे दमट वारेही कमकुवत राहिले. परिणामी देशातील ढगांची निर्मिती कमी झाली आणि पावसाचा जोर घटला.

पावसाने दडी मारल्यामुळे अनेक राज्यांमध्ये तीव्र उकाडा आणि दमट हवामान अनुभवायला मिळाले. ढगांची कमतरता असल्याने सूर्याची तीव्र किरणे थेट जमिनीवर पडली, तर वातावरणातील आर्द्रता कायम राहिल्याने ‘फील्स लाइक’ तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक जाणवले. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उष्म्याचा सामना करावा लागला.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात २४४.६ मिमी पाऊस झाला असून, सरासरी ३२३.१ मिमी पावसाच्या तुलनेत सुमारे २४ टक्के तूट नोंदवली गेली आहे. या पावसाच्या कमतरतेचा परिणाम खरीप पेरणी, जलसाठे आणि मृदेतल्या ओलाव्यावर झाला आहे.

हे ही वाचा:

सलग नवव्या रात्री अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले

बंडखोर खासदारांसाठी स्वतंत्र आसनांमुळे सर्वपक्षीय बैठकीत गोंधळ

कोटक महिंद्रा बँकेचा दमदार तिमाही निकाल; नफ्यात २२.६ टक्क्यांची झेप

एसआयआरमध्ये उघड झाले मालेगावचे धक्कादायक वास्तव

हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात अपेक्षित पाऊस भात, सोयाबीन, कापूस आणि कडधान्यांच्या पेरणीसाठी फायदेशीर ठरेल. तसेच जलाशयांमध्ये पाण्याची आवक वाढण्यास मदत होईल. मात्र, केवळ एका आठवड्याच्या पावसाने हंगामातील २४ टक्क्यांची तूट भरून निघणार नाही. त्यासाठी पुढील काही आठवडे सातत्याने व्यापक पाऊस होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा