25 C
Mumbai
Friday, February 20, 2026
घरविशेषमुंबई शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी राजेश्री राजेश शिरवडकर

मुंबई शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी राजेश्री राजेश शिरवडकर

Google News Follow

Related

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका राजेश्री राजेश शिरवडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पदग्रहण करणार आहेत. हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकासमोर असलेल्या महापालिका मुख्यालयातील शिक्षण समिती दालनात पार पडणार आहे.

२२ सदस्यांच्या शिक्षण समितीत भाजपने ११ सदस्यांसह आपले वर्चस्व कायम ठेवले असून अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांचे नाव महापौर पदाच्या शर्यतीत चर्चेत होते; मात्र पक्षाने त्यांच्यावर शिक्षण समितीची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील पालिका शाळांच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महिला नेतृत्वाचा ठसा

राजेश्री शिरवडकर या भाजपच्या सक्रिय नेत्या असून शिक्षण तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रात त्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे. अनेक वर्षे नगरसेविका म्हणून कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण आणि शैक्षणिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

शिक्षण समितीवर डॉ. नील सोमय्या यांच्यासह अनेक अनुभवी नगरसेवकांची वर्णी लागली आहे. मुंबईच्या शिक्षण क्षेत्रासाठी या नियुक्तीकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

पुष्पगुच्छ नको… विद्यार्थ्यांसाठी लाँग नोटबुक आणा!

पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांना व शुभचिंतकांना पुष्पगुच्छ किंवा शाल-भेटवस्तू न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याऐवजी इच्छुकांनी विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी लाँग नोटबुक आणावीत, अशी विनंती करण्यात आली आहे.

शिक्षणाला प्राधान्य देत केलेल्या या आवाहनाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
294,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा