28.1 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरविशेषदिवाळीनंतर ‘रामायण’चा बॉक्स ऑफिस धमाका!

दिवाळीनंतर ‘रामायण’चा बॉक्स ऑफिस धमाका!

दिवाळीनंतरच्या पहिल्याच सोमवारी १०७.५० कोटींची कमाई

Google News Follow

रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण : पार्ट वन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी या चित्रपटाने कमाईचा मोठा विक्रम केला. दिवाळीनंतरच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरण्याचा मान ‘रामायण’ने मिळवला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’चा पहिल्या सोमवारच्या कमाईचा विक्रमही मागे टाकला आहे.

आकडेवारीनुसार, ‘रामायण’ने ९ नोव्हेंबर रोजी पाचव्या दिवशी भारतात १०७.५० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. चौथ्या दिवशी चित्रपटाने ५६.१५ कोटी रुपये कमावले होते. त्या तुलनेत पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत तब्बल ९१.५ टक्क्यांची वाढ झाली. या दिवशी देशभरातील २३ हजार ९११ शोमधून ही कमाई झाली. या कमाईसह ‘रामायण’ने ‘धुरंधर २’चा पहिल्या सोमवारच्या ६० कोटी रुपयांच्या कमाईचा विक्रम मोडला. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पाच दिवसांत भारतात ३४६.३५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. तर भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ४१३.९० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

हे ही वाचा:

डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी वधारला

अटल सेतू – मुंबई पुणे एक्स्प्रेवेला जोडणाऱ्या उन्नत मार्गाचे ६७ टक्के पूर्ण

वेस्ट इंडिजचा मालिकाविजय!

भारताविरोधात एकत्र या! हाफिज सईदचा मुलगा बरळला

हिंदी व्हर्जनचा सर्वाधिक वाटा

चित्रपटाच्या पाचव्या दिवसाच्या कमाईत हिंदी व्हर्जनचा सर्वाधिक वाटा राहिला. हिंदी भाषेतून ८७.२५ कोटी रुपये, कन्नडमधून ७.५० कोटी, तेलुगूमधून ६ कोटी, तमिळमधून ४ कोटी आणि मल्याळममधून २.७५ कोटी रुपयांची कमाई झाली. परदेशातील बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. पाचव्या दिवशी परदेशातून २५ कोटी रुपयांची कमाई झाली. त्यामुळे चित्रपटाचे परदेशातील एकूण ग्रॉस कलेक्शन २५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. भारत आणि परदेशातील कमाई मिळून जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन ६६३.९० कोटी रुपये झाले आहे.

पहिल्या पाच दिवसांची कमाई

  • पहिला दिवस : ७७.५० कोटी रुपये
  • दुसरा दिवस : ५७.३० कोटी रुपये
  • तिसरा दिवस : ८३.४५ कोटी रुपये
  • चौथा दिवस : ६६.९५ कोटी रुपये
  • पाचवा दिवस : १२८.७० कोटी रुपये
National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा