32 C
Mumbai
Tuesday, March 31, 2026
घरविशेषसंघशताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील डॉक्टरांची राष्ट्रवंदना

संघशताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील डॉक्टरांची राष्ट्रवंदना

राष्ट्रवादी विचारांना बळ देणारा स्वरमय कार्यक्रम

Google News Follow

Related

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने बोरिवली येथील जन सेवा केंद्रतर्फे “राष्ट्र वंदना” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रभक्तीची भावना जागवणारा आणि राष्ट्रवादी विचारांना बळ देणारा हा स्वरमय आणि वैचारिक कार्यक्रम येत्या ५ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. पुण्यातील डॉक्टर कलाकारांकडून सादर होणारी “राष्ट्र वंदना” ही कलाकृती प्रमुख आकर्षण ठरणार आहे

“राष्ट्र वंदना” हा कार्यक्रम प्रबोधनकार नाट्यगृह, बोरिवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी १०.०० ते दुपारी १.३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभक्तीचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचवण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमात पुण्यातील १८ ते २० डॉक्टर कलाकारांकडून सादर होणारी “राष्ट्र वंदना” ही कलाकृती प्रमुख आकर्षण ठरणार आहे. यात संघाच्या वर्गात आणि सत्रांमध्ये जी संघगीते गायली जातात त्यांना संगीतबद्ध करून उपस्थितांना याचा आस्वाद घेता येणार आहे. गाणी संगीत, सादरीकरण आणि राष्ट्रभक्तीचा संगम असलेली ही प्रस्तुती उपस्थितांना मंत्रमुग्ध करेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.

यासोबतच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे “संघवृद्धीत संघगीतांचे योगदान” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या अनुभवसंपन्न विचारांमुळे संघकार्य आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेचा सखोल वेध घेण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.

हे ही वाचा:

अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी

बलुचिस्तानमध्ये सुरक्षादलाच्या जवानांवर हल्ले; तिघांचा मृत्यू

कॅनडामध्ये खलिस्तानी प्रतीकांवर लगाम; सार्वजनिक प्रदर्शन दंडनीय

इराणच्या शस्त्रसाठ्यावर अमेरिकेकडून ‘बंकर बस्टर’ बॉम्बने हल्ला

“राष्ट्र वंदना” हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून राष्ट्रप्रेम, संस्कार आणि विचारांची प्रेरणा देणारा एक प्रवास ठरणार आहे. विविध क्षेत्रातील नागरिक, तरुणाई आणि राष्ट्रभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रविचार अधिक दृढ करण्यासोबतच समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा