28 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरविशेष...म्हणून नागरिकांनीच केले 'खड्डे बुजवा' आंदोलन

…म्हणून नागरिकांनीच केले ‘खड्डे बुजवा’ आंदोलन

Google News Follow

पावसाळा सुरू झाल्यावर अवघ्या महिनाभरातच मुंबईसह आसपासच्या उपनगरांमध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे. अंधेरीत अशा खड्ड्यांना कंटाळलेल्या स्थानिकांनीच खड्डे बुजविण्यास सुरुवात केली.

खड्डे बुजवण्यात अंधेरीतील विमानतळ प्राधिकरणांकडून कोणतीच हालचाल होत नसल्यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यातूनच या नागरिकांनी शेवटी स्वतः खड्डे बुजवण्याचे ठरवले. नागरिक खड्डे बुजवत असतानाच, विमानतळ प्राधिकरणाने यंत्रसामग्री व कामगार पाठवून रस्त्याच्या दुरुस्तीते काम हाती घेतले. त्यावेळी कामगारांना गुलाबाची फुले देऊन आंदोलनकर्त्यांनी प्राधिकरणाचे आभार मानले.

एव्हाना मुंबईतील अनेक रस्त्यांची चाळण झालेली आहे. असे असले तरी महापालिकेने मात्र केवळ ११ खड्डे शिल्लक असल्याचे म्हटले आहे. खड्डे बुजवणे हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. खड्डे बुजवताना माया जमवण्यासाठी कंत्राटदार निकृष्ट प्रतीचा माल वापरून वेळ मारून नेतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मात्र अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाॅचडाॅग या संस्थेने त्यामुळेच आता खड्डे बुजवून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

बाईकस्वारांना तर पाठदुखीमुळे त्रस्त व्हायची वेळ आलेली आहे. डांबर, सिमेंट ऐवजी मुरूम माती टाकून तात्पुरते खड्डे कसे तरी बुजवतात. विविध कारणांनी रस्ते पुन्हा खोदतात. एकूणच काय तर रस्त्यांचे काम नीट न झाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात खड्डे हे पडतातच.

हे ही वाचा:
‘या’ राजकीय नेत्याचा राजकारणातून सन्यास

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही

पीव्ही सिंधू पराभूत होऊनही पदकाची आशा?

हॉटेलवाल्यांनी आता हात टेकले

महापालिकेकडून अजूनही हे खड्डे बुजवण्याच्या कामामध्ये होत असलेली दिरंगाई आता वाहनचालकांच्या जीवावर बेतणारी आहे. खड्डे असताना त्यातून वाहने हाकणे आता अतिशय जिकीरीचे झालेले आहे. अनेकदा कंत्राटदारांकडून वरवरचे आणि निकृष्ट दर्जाचे काम केले जाते. त्यामुळेच मुंबईकरांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा