पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात सुरु असलेल्या “विकसित भारत संकल्प” या उपक्रमांतर्गत, कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स येथील आशा नगर को-ऑप. हाउसिंग फेडरल सोसायटी परिसरातील रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे आज (१६ जून) उद्घाटन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना आमदार भातखळकर यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत सांगितले की, “समाज आणि देशाच्या विकासात प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असते. आपण सर्वांनी पुढाकार घेऊन आपला परिसर अधिक सक्षम, सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. हा रस्ता विकास हा केवळ भौतिक सुविधा पुरवण्याचा उपक्रम नसून, हा नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचा एक भाग आहे.”
पूर्वीच्या सरकारने जनतेला विविध सुविधा देण्याच्या नावाखाली फक्त समित्या स्थापन केल्या, पण त्या सुविधा प्रत्यक्षात सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सक्षम आणि पारदर्शक नेतृत्वामुळे गेल्या ११ वर्षांत सर्व योजनांचा थेट लाभ सामान्य जनतेला मिळाला आहे. आज ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राद्वारे देशाचा सर्वांगीण विकास घडवण्यात येत आहे.
हे ही वाचा :
हिंदू मुलींना अडकवा, लग्न करा आणि वेश्या व्यवसायात ढकला! कॉंग्रेसचे लव्ह जिहादसाठी फंडिंग?
‘सायबर सुरक्षा’ सरावाचा प्रारंभ
आतंकवादाविरोधात पाठिंबा दिल्याबद्दल आभार
इराणमध्ये दहा हजारांहून अधिक अडकलेल्या भारतीयांना भूमार्गाद्वारे बाहेर पडण्याची मिळाली परवानगी!
विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विचारसरणीला समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी समर्पित भावनेने, एकजुटीने कार्य करणे अत्यावश्यक आहे असे आव्हान आमदार भातखळकर यांनी उपस्थितांना केले.







