33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषभारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर

भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर

Google News Follow

Related

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याला भारताच्या एक दिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार करण्यात आले आहे. तर आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी कसोटी संघाचे उपकर्णधार पदही रोहित शर्माकडे असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बुधवार, ८ डिसेंबर रोजी हा महत्वपूर्ण निर्णय बीसीसीआय मार्फत जाहीर करण्यात आला आहे.

विराट कोहली याने आपण मर्यादित षटकांच्या सामन्यात कर्णधारपद सोडत असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. टी २० विश्वचषकानंतर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचे कोहलीने सांगितले होते. तेव्हापासूनच रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. रोहित शर्मा हा मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये उपकर्णधार म्हणून भारताचे नेतृत्व करत होता. त्यामुळे स्वाभाविकपणे कर्णधारपद रोहितकडे जाणार असल्याचे म्हटले जात होते. त्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. तर रोहितने आत्तापर्यंत अनेकदा कर्णधार म्हणून जबाबदारी पार पडताना भारतीय संघाला विजयश्री मिळवून दिले आहे. त्यामुळे रोहितकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय योग्यच असल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली बिपीन रावत यांना श्रद्धांजली

पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार

सीडीएस बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन

अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही चीनच्या ऑलिंपिकवर बहिष्कार

दरम्यान रोहित शर्माकडे कसोटी संघाचे उपकर्णधार पद जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या काही मालिकांमध्ये उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या सादरीकरणात घसरण झाल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. गेल्या काही मालिकांमध्ये अजिंक्य रहाणे हा सातत्याने अपयशी होताना दिसला आहे. त्यामुळेच अजिंक्य रहाणे याला संघातून डच्चू दिला जाऊ शकतो आणि उपकर्णधार पदही त्याच्याकडून परत घेतले जाऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत होता. त्यानुसार आता अजिंक्य रहाणे कडून उपकर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा