30 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरविशेषटी-२० विश्वचषकात रोहित-विराट करणार सलामीला

टी-२० विश्वचषकात रोहित-विराट करणार सलामीला

Google News Follow

Related

आयपीएल २०२४ नंतर लगेच टी-२० विश्वचषकाची रणधुमाळी रंगणार आहे. टी-२० विश्वचषकाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत खेळाडूंबाबत चर्चा झाली. बीसीसीआयच्या बैठकीत कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकरही उपस्थित होते. या बैठकीत रोहितसह विराट कोहली सलामीला खेळू शकेल, याची चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

गेल्या आठवड्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची राहुल द्रविड, अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांच्यात बैठक झाली. यामध्ये कोहलीला सलामीची संधी देण्याची चर्चा झाली. रोहित शर्मा जर कोहलीसोबत सलामी आल्यास यशस्वीचे पत्ता कट होऊ शकतो. शुभमन गिल पर्यायी सलामीवीर म्हणून टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. आयपीएल २०२४ मध्ये यशस्वी काही विशेष छाप पाडू शकलेला नाही. त्याने ७ सामन्यात १२१ धावा केल्या आहेत.

रियान परागबाबतही चर्चा
रियान परागबाबतही बैठकीत चर्चा झाली. रियनला टी-२० विश्वचषक २०२४ साठी संधी मिळू शकते. आयपीएल २०२४ मधील त्याची कामगिरी पाहिली तर ती चांगली आहे. रियानने ७ सामन्यात ३१८ धावा केल्या आहेत. मयंक यादवने आपल्या तुफानी वेगाने खळबळ उडवून दिली होती. मात्र तो जखमी झाला आहे. मयंकबद्दलही चर्चा झाली होती. मात्र आता त्याचे तिकीट कापण्यात आले आहे.

हेही वाचा :

दाऊद छोटा शकील गँगच्या नावे एकनाथ खडसेंना धमकीचे फोन

महेश मांजरेकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट का सोडला?

अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर!

राहुल गांधींच्या रामनवमी शुभेच्छांमध्ये प्रभू श्री रामांच्या फोटोचा विसर

बोर्डाच्या नजरा पंड्यावर
हार्दिक पंड्या खराब फॉर्मशी झगडत आहे. बोर्डाची पंड्यावरही करडी नजर आहे. तो सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. आयपीएल २०२४ मध्ये त्याची कामगिरी साजेशी झालेली नाही. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पंड्या अवघ्या २ धावा करून बाद झाला. गोलंदाजी करताना ४३ धावा दिल्या. पंड्याने आरसीबीविरुद्ध २१ धावा केल्या होत्या. हैदराबादविरुद्ध गोलंदाजी करताना त्याने ४६ धावा दिल्या होत्या. फलंदाजी करताना २४ धावा करून बाद झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा