खान सरविरोधातील वाद; जामीन मिळाल्यानंतर रोशन आनंद तुरुंगाबाहेर,

कटकारस्थानाचा केला आरोप

खान सरविरोधातील वाद; जामीन मिळाल्यानंतर रोशन आनंद तुरुंगाबाहेर,

बिहारची राजधानी Patna येथील खान ग्लोबल स्टडीज आणि ज्ञान बिंदू कोचिंग सेंटर यांच्यात सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, ज्ञान बिंदू कोचिंग सेंटरचे संचालक रोशन आनंद यांना सोमवारी जामीन मंजूर झाल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले.

तुरुंगातून बाहेर पडताच रोशन आनंद यांनी चर्चित शिक्षक फैझल खान उर्फ खान सर यांच्यावर अनेक आरोप केले. त्यांनी एका कोल्ड स्टोरेज मालकाचाही उल्लेख करत म्हटले की, कट रचून त्यांच्या भावाची हत्या करण्यात आली आहे. रोशन आनंद म्हणाले, “मी बाहेर असताना माझ्या भावासोबत काहीच घडले नाही. पण मी तुरुंगात गेल्यानंतर माझा भाऊ प्रिन्स याची हत्या झाली. हा एक कट आहे.

तुरुंगातून सुटल्यानंतर भावूक झालेल्या रोशन आनंद यांनी पुढे सांगितले, “फैजल खान  खूप खोटे बोललेले आहेत. सर्व काही करणारे फैजल खान बाहेर राहिले आणि आम्ही तुरुंगात गेलो. आम्ही निर्दोष होतो, तरीही आम्हाला अडकवण्यात आले. माझा भाऊ गेला, सर्व काही संपले.

हे ही वाचा:

“ट्रम्प यांचा करार बंधनकारक नाही”

जर्मनीने रचला इतिहास, फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा संघ

मदरशातील शिक्षकासोबत लग्न ठरल्याने मुलीने संपवले जीवन

तृणमूलचे बंडखोर खासदार नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीत होणार विलीन?

यापूर्वी खान इन्स्टिट्यूटसमोर झालेल्या कथित हल्ला आणि गोळीबार प्रकरणात रोशन आनंद यांना मोठा दिलासा मिळाला. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी पाटणा सिव्हिल कोर्टात झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापले युक्तिवाद मांडल्यानंतर न्यायालयाने रौशन आनंद यांना जामीन मंजूर केला.

हे प्रकरण शिक्षक फैजल खान यांच्या कोचिंग संस्थेबाहेर झालेल्या कथित गोळीबार आणि झटापटीशी संबंधित आहे. या घटनेनंतर रोशन आनंद यांना आरोपी ठरवून अटक करण्यात आली होती आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. दरम्यान, रौशन आनंद यांचा भाऊ प्रिन्स याचा नेपाळमधील एका हॉटेलमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. पोलिसांनी रविवारी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला.

Exit mobile version