29 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषराहुल गांधींनी पक्षाच्या कार्यकर्त्याला कुत्र्याने नाकारलेले बिस्किट दिल्याने हंगामा

राहुल गांधींनी पक्षाच्या कार्यकर्त्याला कुत्र्याने नाकारलेले बिस्किट दिल्याने हंगामा

राहुल गांधी यांनी आरोप फेटाळले

Google News Follow

Related

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्याला कुत्र्याने नाकारलेली बिस्किटे दिल्याने वाद निर्माण झाला आहे. झारखंडमधील रांची शहरात त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान घडलेल्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याबद्दल बोलताना भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यांशी केली होती आणि येथे राहुल गांधी त्यांच्या भेटीदरम्यान कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत आहेत. जेव्हा कुत्र्याने काही खाल्ले नाही तेव्हा तिच बिस्किटे आपल्या कार्यकर्त्याला दिली. भाजपच्या आणखी एका नेत्या पल्लवी सीटी यांनी तोच व्हिडिओ ट्विट केला आहे.

हेही वाचा..

वंदे भारतनंतर ठाकरेंना बुलेट ट्रेनचीही सफर घडविणार

मध्यप्रदेशातील फटाका कारखान्यात स्फोट, ११ जणांचा होरपळून मृत्यू तर ६० जण जखमी!

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी घरोघरी पोहोचवणार

बाळा नांदगावकरांनी राज ठाकरेंना दिली बाबरीची वीट

या  ट्विटला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी २०२१ मध्ये एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखातीत २०१६ मध्ये घडलेला किस्सा सांगितला होता. एक बैठक सुरु असताना टेबलावर एक कुत्रा आला आणि त्याने टेबलावरील बिस्कीट उचलले. त्यावेळी राहुल गांधी माझ्याकडे बगून हसले. आपण वाट बघत होतो की, राहुल गांधी कोणाला तरी प्लेट बदलायला सांगतील.

आपण नंतर पहिले की त्यावेळी कॉंग्रेसचे नेते जोशी, गोगाई वगैरे नेते त्याच प्लेटमधून बिस्किटे खाताना पाहिले. त्याचवेळी आपण या व्यक्तीबरोबर राहू शकत नाही असा सरमा यांनी निष्कर्ष काढला होता. यावर कॉंग्रेसकडून म्हणजेच राहुल गांधी यांनी खुलासा केला आहे कि त्यांनी एका कुत्र्याला बिस्कीट दिले तो कुत्रा थरथरत होता. जेव्हा बिस्कीट त्याला ख्याला दिले तेव्हा तो प्रचंड घाबरला होता म्हणून ते बिस्कीट आपण त्या कुत्र्याच्या मालकाला दिले. त्यानंतर त्या कुत्र्याने ती बिस्किटे खाल्ली. त्यात काय अडचण आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा