28 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरविशेषS-४००चे भारतात आगमन

S-४००चे भारतात आगमन

Google News Follow

Related

रशियाने भारताला S-४०० हवाई संरक्षण प्रणाली देण्यास सुरुवात केली आहे, असे एका वरिष्ठ रशियन अधिकाऱ्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नियोजित वार्षिक शिखर परिषदेआधी नवी दिल्ली भेटीपूर्वी सांगितले आहे.

भारताला S-४०० सिस्टीमचे वितरण नियोजित केल्याप्रमाणे सुरू आहे. रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी-टेक्निकल कोऑपरेशनचे संचालक दिमित्री शुगाएव यांनी राज्य-संचालित स्पुतनिक न्यूज सर्व्हिसला सांगितले.

“भारताला S-४०० हवाई संरक्षण प्रणालीचा पुरवठा सुरू झाला आहे. तो वेळापत्रकानुसार सुरू आहे.” शुगाएव यांनी अधिक तपशील न देता सांगितले. या विकासावर भारतीय बाजूने कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

हिंदुस्तान टाईम्सने गेल्या आठवड्यात वृत्त दिले होते की, एस-४०० सिस्टीमच्या पहिल्या तुकडीचे वितरण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या वार्षिक शिखर परिषदेसाठी, डिसेंबरमध्ये नवी दिल्ली भेटीच्या आसपास होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे दोन्ही देश त्यांच्या सैन्याचे नूतनीकरण करतील.

ऑक्टोबर २०१८ मध्ये वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन यांच्या भारताच्या शेवटच्या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी पाच S-४०० प्रणालींसाठी $५.४ अब्ज डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली होती. अमेरिकेच्या चेतावनीनंतरही भारताने अलीकडच्या काही महिन्यांत हा करार पुढे जाण्याचा आपला इरादा दर्शविला आहे. Countering America’s Adversaries Through Sanctions Act (CAATSA) अंतर्गत निर्बंध आकर्षित करू शकतात.

भारतीय हवाई दलाच्या कर्मचार्‍यांच्या अनेक तुकड्यांना रशियामध्ये हवाई संरक्षण प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्याचा उपयोग प्रमुख शहरे, मोक्याची स्थापना आणि देशाच्या सीमांच्या संवेदनशील भागांचे संरक्षण करण्यासाठी केला जाईल. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर पाच वर्षांत सर्व यंत्रणांचे वितरण पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

शिवशाहिरांनी ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श सतत प्रेरणा देतील

काय आहे दादरा, नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामातील बाबासाहेब पुरंदरेंची भूमिका?

… म्हणून आजचा दिवस मोदींसाठी भावनिक

ठाकरे सरकार राज्यात इस्लामिक दंगली भडकावतंय

आयएएफने अशा वेळी S-४०० सिस्टीमचे पहिले युनिट समाविष्ट करणे अपेक्षित आहे. जेव्हा भारत चीनसोबतच्या सीमेवर अडकलेला आहे, ज्याने लडाख आणि तिबेटमधील शिनजियांगमधील होटन एअरबेस आणि तिबेटमधील न्यिंगची एअरबेसवर दोन S-४०० स्क्वॉड्रन तैनात केले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा