क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही झाला डिपफेकचा शिकार!

सोशल मीडियावर पोस्टकरत सतर्क राहण्याचे केले आवाहन

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही झाला डिपफेकचा शिकार!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही डीपफेक व्हिडिओंचा बळी ठरलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाला आहे. तेंडुलकरचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका गेमिंग ॲपची जाहिरात करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सचिन केवळ ॲपला मान्यता देतानाच दिसत नाही तर त्याची मुलगी साराला ॲपमधून आर्थिक फायदा होत असल्याचा खोटा दावाही करत आहे .

डीपफेक व्हिडिओमुळे जगभरातील प्रतिष्ठित व्यक्ती, अभिनेते बळी पडत आहेत. यामध्ये आता माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावाचा देखील समावेश झाला आहे.नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर एका गेमची जाहिरात करताना दिसत आहे.तसेच या खेळातून कसा फायदा होतो हे देखील सांगण्यात आले आहे.विशेष म्हणजे हा गेम खेळल्यामुळे सचिन यांची मुलगी सारा हीला देखील फायदा होत असल्याचे व्हिडिओमध्ये सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

पतीच्या वाहनचालकाशी प्रेमसंबंध, पत्नीने स्वतःचे ‘कुंकू पुसले’

चायनीज मांजाने घेतला २९ वर्षीय जवानाचा जीव

दिव्या पाहुजाच्या डोक्यात गोळी घातल्याचे निष्पन्न!

ट्रेनमध्ये पाणी गरम करण्यासाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटमध्ये लावली इलेक्ट्रिक किटली!

डीपफेक व्हिडिओबाबत सचिनला माहिती मिळताच त्याने आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला.डीपफेक व्हिडिओ शेअर करताना सचिनने लिहिले – हा व्हिडिओ फेक आहे. तंत्रज्ञानाचा सर्रास होणारा गैरवापर पाहून मन अस्वस्थ होते.यासारख्या मोठ्या संख्येने व्हिडिओ, जाहिराती आणि ॲप्स येत आहेत, त्याबाबत तक्रार करण्याची विनंती सर्वांना केली आहे.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सतर्क राहणे आणि तक्रारींना प्रतिसाद देण्याची गरज आहे. चुकीची माहिती आणि डीपफेकचा प्रसार रोखण्यासाठी त्यांच्याकडून त्वरित कारवाई करणे महत्त्वाचे आहे, असे सचिनने पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच आपल्या पोस्टमध्ये तेंडुलकरने इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि महाराष्ट्र सायबर क्राईम यांनाही सतर्क केले आहे.

Exit mobile version