30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
घरक्राईमनामादिव्या पाहुजाच्या डोक्यात गोळी घातल्याचे निष्पन्न!

दिव्या पाहुजाच्या डोक्यात गोळी घातल्याचे निष्पन्न!

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक गोष्टी उघड

Google News Follow

Related

हरियाणाच्या गुरुग्राममधील मॉडेल दिव्या पाहूजाचे हत्या प्रकरण चर्चेत आहे.हत्येच्या ११ दिवसानंतर अखेर पोलिसांना दिव्या पाहुजाचा मृतदेह सापडला.शनिवारी १३ जानेवारी रोजी दिव्याचा मृतदेह फतेहाबादच्या टोहना कालव्यामध्ये सापडला.यानंतर मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले, ज्यामध्ये या प्रकरणाबाबत नवे खुलासे समोर आले आहेत.

मॉडेल दिव्याची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याचे पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झाले आहे.दिव्या पाहुजा हिच्या मृतदेहाचे रविवारी मेडिकल कॉलेज अग्रोहा येथील शवागारात शवविच्छेदन करण्यात आले. चार डॉक्टरांच्या पथकाने मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनादरम्यान मॉडेलच्या डोळ्याजवळून गोळ्यांचे तुकडे सापडले. शरीरावर जखमेच्या खुणाही आढळून आल्या आहेत.दरम्यान, शवविच्छेदनानंतर व्हिसेरा, मधुबनच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जाणार आहे.

हे ही वाचा..

ट्रेनमध्ये पाणी गरम करण्यासाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटमध्ये लावली इलेक्ट्रिक किटली!

अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत खरेदी केला प्लॉट!

दिल्लीत धुक्यामुळे १० विमाने दुसरीकडे वळवली, २० उड्डाणे रद्द, ४०० विमानांना उशीर!

टिकली, लिपस्टिक अन् हातकड्या… परीक्षेत मुलगी असल्याचे भासवणाऱ्या पंजाबमधील मुलाला अटक!

शवविच्छेदनानंतर दिव्याचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा गुरुग्राममधील मदनपुरी स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गुरुग्राम गुन्हे शाखेचे निरीक्षक ब्रह्मा कुमार यांनी सांगितले की, मॉडेल दिव्या पाहुजाच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमसाठी डॉक्टर मनमोहन, संदीप, नीतू आणि संदीप यांची एक टीम तयार करण्यात आली होती. गोळी शरीरात कुठे अडकली आहे हे शोधण्यासाठी पोस्टमॉर्टमपूर्वी मृतदेहाचा एक्स-रे करण्यात आला. एक्स-रे काढल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने दुपारी दोन वाजता मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू केले. सुमारे अडीच तास शवविच्छेदन सुरू होते. पोस्टमॉर्टमदरम्यान मॉडेलच्या डोळ्यावर गोळी लागल्याचे समोर आले. मृतदेहाच्या आतून गोळ्यांचे छर्रेही जप्त करण्यात आल्याचे ब्रह्मा कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, गुरुग्राममध्ये हॉटेलचालक आरोपी अभिजीतने मॉडेल दिव्याची हत्या केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह पंजाब परिसरातील एका कालव्यात फेकून देण्यात आला. पोलिसांनी ११ दिवसांनी दिव्याचा मृतदेह टोहाणा कालव्यातून बाहेर काढला.या प्रकरणातील तीन मुख्य आरोपी हॉटेल मालक अभिजित सिंग, त्याचा कर्मचारी हेमराज आणि ओमप्रकाश यांना अटक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा