34 C
Mumbai
Sunday, November 3, 2024
घरविशेषट्रेनमध्ये पाणी गरम करण्यासाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटमध्ये लावली इलेक्ट्रिक किटली!

ट्रेनमध्ये पाणी गरम करण्यासाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटमध्ये लावली इलेक्ट्रिक किटली!

प्रवाशाला अटक

Google News Follow

Related

चालत्या ट्रेनमध्ये इलेक्ट्रिक किटलीने पाणी गरम करणे प्रवाशाला महागात पडले आहे. प्रत्यक्षात तो मोबाईल फोनच्या चार्जिंग पॉईंटवरून पाणी गरम करत होता. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने दोघांना अटक केली आहे. आरपीएफने त्याच्याविरुद्ध रेल्वे कायदा कलम १४७ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी संध्याकाळी महाबोधी एक्सप्रेस गयाहून नवी दिल्लीला जात होती. तेव्हा ही घटना घडली.अटक करण्यात आलेला प्रवासी लेहमधील रहिवासी आहे.त्याने चालत्या ट्रेनमध्ये मोबाईल फोनच्या चार्जिंग पॉईंटवरून पाणी गरम केले.पाणी गरम करण्यासाठी त्याने किटलीचा वापर केला.त्यामुळे प्रवाशाला अटक करण्यात आली.अटक करण्यात आलेल्या प्रवाशाने सांगितले की, कोचमध्ये ७० वर्षांची वृद्ध महिला होती. त्या महिलेला औषध घेण्यासाठी गरम पाण्याची गरज होती. प्रवाशाने पॅन्ट्री कार कर्मचाऱ्यांकडे गरम पाणी मागितले होते, पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे प्रवाशाने स्वत: पाणी उकळण्याचा निर्णय घेतला, असे त्याने सांगितले.

हे ही वाचा..

दिल्लीत धुक्यामुळे १० विमाने दुसरीकडे वळवली, २० उड्डाणे रद्द, ४०० विमानांना उशीर!

अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत खरेदी केला प्लॉट!

टिकली, लिपस्टिक अन् हातकड्या… परीक्षेत मुलगी असल्याचे भासवणाऱ्या पंजाबमधील मुलाला अटक!

शशी थरूर यांचे भाकीत… ‘भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल’

या प्रकरणी ३६ वर्षीय व्यक्तीवर आरपीएफने रेल्वे कायद्याच्या कलम १४७ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.त्याला अलीगड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला आरपीएफ अधिकाऱ्याने १००० रुपये दंड ठोठावला आणि इशारा देऊन सोडून दिले.रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हणाले की, प्रवाशाच्या कृत्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकले असते, आणि ट्रेनच्या एसी-III डब्यात आग लागली असती.आरपीएफ पोस्ट कमांडर राजीव वर्मा यांनी सांगितले की, जेव्हा प्रवासी पाणी गरम करत होता तेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले होते.त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.त्यानंतर प्रवाशाला अटक करून कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा