32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरक्राईमनामापतीच्या वाहनचालकाशी प्रेमसंबंध, पत्नीने स्वतःचे 'कुंकू पुसले'

पतीच्या वाहनचालकाशी प्रेमसंबंध, पत्नीने स्वतःचे ‘कुंकू पुसले’

पतीची मालमत्ता ताब्यात घेण्याचा होता डाव

Google News Follow

Related

नवी मुंबईतील विकासकाच्या कार्यालयात त्याची हत्या करण्यात आली होती. विकासकाची पत्नी आणि विकासकाच्या कार्यालयात काम करणारा त्याचा मदतनीस व चालक असणाऱ्या तरुणाचे प्रेमसंबंध असल्याने त्यांनीच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शमसुद्दीन खान (२२) उर्फ राजू सिंह याला अटक करण्यात आली आहे. त्याने शुक्रवारी संध्याकाळी विकासकाच्या डोक्यावर सळीचा घाव घालून त्याची हत्या केली होती. तर, पत्नी पूनम (३५)हिलादेखील अटक करण्यात आली आहे.

मनोज सिंह (४५) यांचा मृतदेह शनिवारी सकाळी त्यांच्या कार्यालयात आढळला होता. या हत्येप्रकरणी आता विकासकाची पत्नी पूनम (३५) हीदेखील आरोपी आहे. ‘विकासकाच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता हडप करण्यासाठी त्या दोघांनी हत्येचा कट रचल्याची कबुली दिली आहे,’ अशी माहिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

हे ही वाचा:

ट्रेनमध्ये पाणी गरम करण्यासाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटमध्ये लावली इलेक्ट्रिक किटली!

चायनीज मांजाने घेतला २९ वर्षीय जवानाचा जीव

अखिलेश यादव म्हणतात अयोध्येला नंतर जाणार

‘आम्हाला गाझामध्ये कोणीही रोखू शकत नाही’

विकासकाच्या कार्यालयाचा दरवाजा आणि त्याच्या केबिनचा दरवाजा या दोन्हींमध्ये डिजिटल लॉकिंग यंत्रणा बसवण्यात आली होती आणि केवळ विकासकालाच ते दोन्ही दरवाजे उघडता येत होते. त्यामुळे चालकाकडेच संशयाची सुई वळली होती. शुक्रवारी रात्री विकासकाच्या पत्नीने त्याच्यासाठी जेवण बनवले होते. त्यानंतर खान याने त्याची हत्या केली.
विकासकाच्या पत्नीला जेव्हा अटक करण्यात आली, तेव्हा तिने चालकानेच या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली.

 

त्या दोघांनाही त्याच्या त्रासातून सुटका हवी होती आणि त्याची मालमत्ता त्यांना ताब्यात घ्यायची होती. चालकाने तिला पोलिसांशी खोटे बोलायलाही सांगितले. विकास त्या रात्री एका ग्राहकाला भेटण्यासाठी कार्यालयातच थांबणार होता, असे त्याने तिला सांगायला सांगितले. त्यानंतर चालकाने के. कुमार नावाचा ग्राहक त्यांना भेटण्यासाठी येत असल्याचे सांगून त्या व्यावसायिकाला थांबवून ठेवले होते. विकासकाच्या पत्नीने सांगितल्यानुसार, तिचा पती चार महिन्यांपासून फसवणुकीच्या प्रकरणात तुरुंगात होता. तेव्हा हा चालक तिची भेट घेण्यासाठी वारंवार उलवे येथे येत असे, तेव्हा त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र तो तिला आर्थिक मदत करत नसे, अशीही माहिती तिने पोलिसांना दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा