28 C
Mumbai
Tuesday, January 20, 2026
घरविशेषसचिनचा सुपुत्र अर्जुन होणार आता जावई

सचिनचा सुपुत्र अर्जुन होणार आता जावई

उद्योगपती रवी घई यांची नात सानियाशी जुळले नाते

Google News Follow

Related

मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला आहे.

मुंबईतील नामांकित उद्योजक रवी घई यांची नात सानिया चंढोक हिच्याशी अर्जुनचा साखरपुडा झाला आहे.

अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची चर्चा असली तरी, तेंडुलकर कुटुंबीय किंवा घई कुटुंबीयांनी याबाबत अधिकृत पुष्टी केलेली नाही.

कोण आहे सानिया चंढोक?

हा सोहळा अतिशय खासगी स्वरूपाचा होता, ज्यात केवळ निकटचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. २५ वर्षीय अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून, तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याच्या संघाकडून खेळतो आणि IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडूनही तो खेळला आहे. मुंबईतील प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यातील सानिया प्रकाशझोतात राहणे पसंत करत नाही.

सानिया या मुंबईस्थित “Mr. Paws Pet Spa & Store LLP” या संस्थेत डिझिग्नेटेड पार्टनर आणि डायरेक्टर आहेत. घई कुटुंब हॉटेल व खाद्य व्यवसायात प्रसिद्ध असून, त्यांच्याकडे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि लोकप्रिय “ब्रुकलिन क्रीमरी” ही आइसक्रीम ब्रँड आहे. त्यांचा साखरपुडा केवळ जवळच्या मित्र-नातेवाईकांच्या उपस्थितीत, अत्यंत खासगी वातावरणात पार पडला.

हे ही वाचा:

युक्रेन युद्ध थांबवा, नाहीतर… पुतीन यांना कुणी दिली धमकी?

एंटेलिया खाली पुन्हा स्फोटके…

सेबीने एल्गोरिदम ट्रेडिंगची व्याख्या केली निश्चित

‘या’ फुलाला आयुर्वेदात का आहे महत्त्वाचे स्थान

अर्जुन तेंडुलकरची क्रिकेट कारकीर्द

अर्जुन तेंडुलकर आपल्या क्रिकेट प्रवासात सातत्याने प्रगती करत आहे. सध्या तो गोव्याचे प्रतिनिधित्व करतो आणि IPL २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता. त्याने आपली व्यावसायिक कारकीर्द २०२०/२१ हंगामात मुंबईकडून हरियाणाविरुद्ध टी २० सामन्याने सुरू केली. वरिष्ठ संघात प्रवेश करण्यापूर्वी तो मुंबईच्या ज्युनियर संघात आणि भारत अंडर-१९ संघातही खेळला होता.

अधिक संधींच्या शोधात अर्जुनने २०२२/२३ हंगामात गोव्यात स्थलांतर केले. तेथे त्याने प्रथम श्रेणी आणि यादी ए लिस्टेड या दोन्ही प्रकारांत पदार्पण केले. लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये तो आतापर्यंत १७ सामने खेळला असून, ५३२ धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतके समाविष्ट आहेत. गोलंदाज म्हणून त्याने ३७ बळी घेतले असून, त्यात एकदा पाच बळी आणि दोनदा चार बळी मिळवले आहेत. गोव्याच्या यादी A सामन्यांमध्ये त्याने १७ सामन्यांत नऊ डावांतून ७६ धावा केल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा