27 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरविशेषसलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाचे मुंबईतील चित्रीकरण रद्द, सेट पाडला!

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचे मुंबईतील चित्रीकरण रद्द, सेट पाडला!

अभिनेता कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबूची साकारतोय भूमिका

Google News Follow

Related

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील ‘बॅटल ऑफ गलवान’ या नवीन चित्रपटाचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे. जुलैमध्ये वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये उभारलेला सेटही आता पाडण्यात येत आहे. हा चित्रपट २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यांमधील संघर्षावर आधारित आहे. अहवालानुसार, दिग्दर्शक अपूर्व लाखिया आणि निर्मात्यांनी एक सर्जनशील निर्णय घेतला आहे आणि मुंबईचे वेळापत्रक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण आता २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान थेट लडाखमध्ये सुरू होईल.

माहितीनुसार निर्माते सुरुवातीपासूनच अ‍ॅक्शन दृश्ये चित्रित करू इच्छितात आणि या चित्रपटात सलमानचा लूक वेगळा असल्याने, मुंबई आणि लडाखच्या वेळापत्रकामधील ३० दिवसांचे अंतर अपेक्षित दृश्य सातत्य बिघडवत होते. टीममधील सूत्रांचे म्हणणे आहे की, ” दिग्दर्शक अपूर्वला वाटते की सीन्स एकत्र शूट करणे महत्त्वाचे आहे. नंतर, मुंबईत गाणी किंवा पॅचवर्कची आवश्यकता आहे की नाही हे शेवटच्या टप्प्यात ठरवले जाईल.” सलमान खान चित्रपटात कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबूची भूमिका साकारणार आहे.

अलिकडेच अशी चर्चा होती की संरक्षण मंत्रालयाने चित्रपटाच्या संवेदनशील विषयामुळे चित्रपट थांबवला आहे. परंतु या अफवांना फेटाळून लावत टीम ने म्हटले आहे की ‘बॅटल ऑफ गलवान’ एका सैनिकाच्या शौर्य साजरे करण्याचा विषय आहे. आणि चित्रपटात कोणत्याही देशाला खलनायक म्हणून दाखवण्यात आलेले नाही.

हे ही वाचा : 

आडल योगात सावध! रविवारी हे उपाय करा

सीमेचे शूर रक्षक – लहानग्यांच्या राखीने सजले सैन्यप्रमुखांचे मनगट

उत्तरकाशीच्या हाहाकारात महाराष्ट्राचे १७१ पर्यटक सुखरूप, एक महिला बेपत्ता!

“भारताचा विक्रमी संरक्षण उत्पादनाचा टप्पा – ₹१.५१ लाख कोटी”

असेही म्हटले जात आहे की, निर्माते आवश्यक परवानगीशिवाय चित्रपटाची घोषणा करत नाहीत. पहिल्यांदाच चित्रांगदा सिंग आणि सलमान खानची जोडी चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय झेन शॉ, अंकुर भाटिया, हर्षिल शाह, हीरा सोहल, अभिलाष चौधरी आणि विपिन भारद्वाज हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा