केजरीवालांसोबत १० पक्षांनी युती केली असती तरी त्यांचा पराभव निश्चित होता! 

काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांचे वक्तव्य

केजरीवालांसोबत १० पक्षांनी युती केली असती तरी त्यांचा पराभव निश्चित होता! 

दिल्लीतील विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. भाजपने या निवडणुकीत विजय मिळवला आहे आणि सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. या निवडणुकीत भाजपने ४८ जागा जिंकल्या तर आम आदमी पक्षाने २२ जागा जिंकल्या. मात्र, काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना देखील पराभव पत्करावा लागला. त्यांच्या विरुद्ध भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित उभारले होते.

या तिरंगी लढतीत भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी दोनही नेत्यांना पाणी पाजत विजय हासील केला. दरम्यान, केजरीवालांच्या पराभवावर काँग्रेस संदीप दीक्षित यांनी मोठे वक्तव्य केले आहे. केजरीवालांसोबत १० पक्षांनी युती केली असती तरी त्यांचा पराभव झालाच असता, असे दीक्षित म्हणाले.

हे ही वाचा : 

… म्हणून भारतीय खेळाडूंनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात हाताला बांधल्या हिरव्या पट्ट्या

पवारांच्या प्रशंसेचा अर्थ ठाकरेंच्या लक्षात आलाय…

ठाकरेंना सोडून राजन साळवी आले शिंदेंकडे!

भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर ‘डी-लिट’ ने सन्मानित

एएनआयशी संवाद साधताना काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, “दिल्लीच्या जनतेने कोणालाही पराभूत केलेले नाही, तर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकले आहे. जर आपण (आप आणि काँग्रेस) एकत्र निवडणूक लढवली असती तर निकाल आणखी वाईट आले असते. दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांना हटवण्याचा निर्णय घेतला होता. जरी १० पक्षांनी त्यांच्यासोबत युती केली असती तरी ते हरलेच असते.”

ते पुढे म्हणाले, केजारीवालांच्या भ्रष्टाचार विरुद्ध मते पडली आहेत. जर आम्ही एकत्र लढलो असतो तर खराब सरकार पुन्हा येईल असे थोडे होते.

Exit mobile version