श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, श्री संत ज्ञानेश्वर महाराजारांचा ७५०वा जन्मोत्सव तसेच संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा ३७५वा वैकुंठ गमन सोहळा यानिमित्त कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा सांप्रदायिक संघ (कांदिवली पूर्व) यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

१५, १६ व १७ नोव्हेंबरला कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी भव्य भजन स्पर्धा व रांगोळ्यांच्या माध्यमातून संत दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले मैदान, फाऊंडेशन शाळेजवळ, लोखंडवाला संकुल, कांदिवली (पू) येथे हा कार्यक्रम होईल.
हे ही वाचा:
मधुबनीला घुसखोरांचं लॉंचिंग पॅड होऊ द्यायचं नाही
नैनी सैनी विमानतळाच्या अधिग्रहणासाठी सामंजस्य करार
भारताला मातृभूमी मानणारे सर्व ‘हिंदू’
१५ नोव्हेंबरला सकाळी दिंडी सोहळा होणार असून पावणेअकराला प्रमुख पाहुण्याचे भाषण होईल. दुपारी १ वाजता भजन स्पर्धेला प्रारंभ होईल. दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंबरलाही भजन स्पर्धा सुरू राहील. १७ तारखेला सकाळी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून १०.३० वाजता सामुहिक पारायण व नंतर प्रवचन, हरिपाठ, कीर्तन यांचे आयोजन होईल.
संध्याकाळी ६.३० ते रात्री १० या वेळेत सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन तसेच सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे यांच्या भक्ती संगीताचा कार्यक्रम होईल. त्यानंतर भजन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल.







