मेट्रो मार्गिका ९ वरील मेडेतिया नगर स्थानक परिसरात आज सकाळी एक खळबळजनक घटना घडली. कंत्राटदारामार्फत सुरू असलेल्या बांधकामादरम्यान क्रेनच्या सहाय्याने साहित्य हलवत असताना बास्केटचा पदचारी पुलाच्या (FOB) परिसरातील ग्रॅनाइटच्या दगडांना धक्का लागला. त्यामुळे काही दगड खाली बॅरिकेडिंग केलेल्या क्षेत्रात कोसळले.
या घटनेबाबत काही माध्यमांमध्ये स्कूल वॅनवर दगड पडल्याची अफवा पसरली होती. मात्र, एमएमआरडीएने (MMRDA) हे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. एमएमआरडीएने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, या घटनेत कोणत्याही स्कूल व्हॅन किंवा वाहनाला थेट धडक बसलेली नाही, तसेच घटनेच्या वेळी संबंधित वाहनात एकही विद्यार्थी उपस्थित नव्हता. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
हे ही वाचा:
आयएसआय कनेक्शनसह दहशतवादी कट उधळला; २०० हून अधिक संशयित जाळ्यात
भाजपाची ‘नबीन’ जबाबदारी, गोयल कोषाध्यक्ष, तावडे महासचिव
झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या कार्यालयात छापा
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून प्रश्न सोडवा! राहुल गांधींचे सोरेन यांना पत्र
ग्रॅनाइटचे दगड सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या बॅरिकेडिंगच्या आतच पडले होते. मात्र, त्यातील काही छोटे तुकडे बाहेर विखुरले गेले होते. तेथून जाणार्या एका स्कूल व्हॅनचे चाक या तुकड्यांवरून गेल्यामुळे गाडीचा टायर पंक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. या सुरक्षाविषयक त्रुटीची एमएमआरडीएने अत्यंत गंभीर दखल घेत तात्काळ दंडात्मक पावले उचलली आहेत आणि संबंधित यंत्रणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
