28 C
Mumbai
Thursday, April 16, 2026
घरविशेषशबरीन बनली 'सीता', हिंदू तरुणाशी लग्न करत म्हणाली-'मला हिंदू धर्म खूप आवडतो'

शबरीन बनली ‘सीता’, हिंदू तरुणाशी लग्न करत म्हणाली-‘मला हिंदू धर्म खूप आवडतो’

माँ दुर्गा मंदिरात पारंपरिक हिंदू पद्धतीने पार पडला विवाह

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातील मंझनपूर येथील माँ दुर्गा मंदिरात एका अनोख्या प्रेमकथेने सर्वांचे लक्ष वेधले. शबरीन बानो, मुस्लिम कुटुंबातील युवती, हिने आपल्या हिंदू प्रियकर अभिषेक सोनी याच्याशी हिंदू विधीनुसार विवाह केला. विशेष म्हणजे विवाहानंतर तिने आपले नाव बदलून ‘सीता’ ठेवले.

माँ दुर्गा मंदिरात पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह करण्यात आला. हिंदू संरक्षण समितीचे निमंत्रक वेद प्रकाश सत्यार्थी यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. दोघांनी सात फेरे आणि एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची प्रतिज्ञा केली.

शबरीन उर्फ सीता म्हणाली, “मला हिंदू धर्म खूप आवडतो. महिलांना येथे खूप आदर दिला जातो. म्हणून मी हा धर्म मनापासून स्वीकारला आणि अभिषेकसोबत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला.”तिच्या कुटुंबानेही लग्नाला मान्यता दिल्याचे तिने सांगितले.

हे ही वाचा : 

मोहेंजोदारोच्या ‘डान्सिंग गर्ल’ची प्रतिकृती राष्ट्रीय संग्रहालयातून चोरीला; प्राध्यापकावर गुन्हा दाखल

कोळ्यांचं ग्रामदैवत ‘देवी गोल्फामाता’ ; १२ व्या शतकात यादव राजानं स्थापन केलेलं प्राचीन मंदिर!

‘वैभव’शाली फलंदाजी, १० सामन्यांत ४१ षटकारांचा विक्रमी पाऊस

दिवाळीपूर्वी रेल कर्मचाऱ्यांच्या बोनसला मंजुरी

तर देवीगंज येथील अभिषेक सोनी म्हणाला, “आम्ही एकमेकांना नऊ वर्षांपासून ओळखतो. ती माझ्या निर्णयाचा आदर करते, आणि मी तिचा. आम्ही दोघेही लग्नासाठी तयार होतो. आता आम्ही आयुष्यभर एकत्र राहणार आहोत.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा