महाराष्ट्राच्या शांभवी थिटेने जेएनयूमध्ये दिला डाव्यांना खणखणीत इशारा, व्हीडिओ व्हायरल

विद्यापीठ सर्वसाधारण सभेतील भाषणांनी जिंकली मने

महाराष्ट्राच्या शांभवी थिटेने जेएनयूमध्ये दिला डाव्यांना खणखणीत इशारा, व्हीडिओ व्हायरल

जेएनयू या दिल्लीतील विद्यापीठात अजूनही डाव्यांचे वर्चस्व आहे. विद्यार्थी संघटनेतही डाव्या विचारसरणीचाच पगडा पाहायला मिळतो. मात्र आता परिस्थिती बदलते आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही (अभाविप) आता तिथे तोडीसतोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

विद्यार्थी संघटनेच्या विद्यापीठ सर्वसाधारण सभेत अभाविपच्या शांभवी थिटेने केलेल्या भाषणाची सध्या सर्व चर्चा आहे. तिने केलेल्या आक्रमक भाषणाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

गेल्यावर्षी सर्वसाधारण सभेत प्रभू श्रीरामांचा अपमान करण्यात आला होता. तेव्हा ही सभा अभाविपने बंद पाडली. माफी मागा मग सभा घ्या अशी मागणी अभाविपने तेव्हा केली होती. ती सभाच अखेर डाव्या संघटनेने रद्द केली. मात्र यावेळी या सर्वसाधारण सभेत अभाविपचा आवाज होता.

शांभवी आपल्या भाषणात म्हणते की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू इच्छिते. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेने शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. त्याआधी त्यांनी प्रभू श्रीरामांचाही अपमान केला होता. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेला काय वाटते की, इथे महाराष्ट्रातील विद्यार्थी कमी आहेत म्हणजे आपण हवे ते करू शकतो, हवा त्याचा अपमान करू शकतो?

हे ही वाचा:

तेलंगणा: रमजानमुळे काँग्रेस सरकारने दहावीच्या परीक्षेत केला बदल!

मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय, उद्या राजीनामा देतील!

हरियाणात महिला काँग्रेस कार्यकर्त्याचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह!

तेलंगणाच्या बोगद्यात अडकलेल्या ४ जणांचे ठिकाण सापडले!

छत्रपती शिवाजी महाराज ज्या ताकदीने मुघलांविरोधात लढले, त्याच ताकदीने आम्ही जेएनयूमधील डाव्या विद्यार्थी संघटनेविरुद्ध लढणार आहोत. जेएनयू विद्यार्थी संघटनेला आम्ही सांगू इच्छितो की, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून काहीतरी शिका. महिलांशी कसे वर्तन करायचे हे त्यांनी शिकले पाहिजे. या विद्यार्थी संघटनेचे सदस्य नारा देतात की, हर घर से अफजल निकलेगा, पण याच मंचावरून बोलताना मी हा नारा देऊ इच्छिते की, भारतातील प्रत्येक घरातून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आता बाहेर पडेल.

शेवटी तिने एक कविता म्हणत भाषण संपवले पण उपस्थितांनी तिच्या या घणाघाती भाषणाला उत्स्फूर्त दाद दिली.

ती म्हणाली की,

कैसी आस लगा बैठी हो बिके हुए अखबारो से

कैसी रक्षा मांग रही हो, दुःशासन दरबारो से

स्वयं जो लज्जाहीन पडे है, वे क्या लाज बचाएंगे

उठो द्रौपदी चुनाव करवाओ, अब ना लेफ्टिस्ट जेएनयूएयूवाले आएंगे

Exit mobile version