सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षातील नेते, सत्ताधारी पक्षातील काही आमदार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. याच दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार आहेत, दोन दिवसांपूर्वीच मंत्री मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला आहे, असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे.
”३-३-२०२५ को राजीनामा होगा, #करुणा धनंजय मुंडे,” अशी फेसबुक पोस्ट करुणा मुंडे यांनी केली आहे. याबाबत बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड दोषी निघाल्यास राजीनामा देईन असे मंत्री मुंडे यांनी अगोदरच सांगितले आहे आणि धनंजय मुंडे यांच्याकडे आता काहीच राहिले नाहीये.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या दोन दिवसांपूर्वीच राजीनामा घेतला आहे, अशी सूत्रांकडून माहिती आहे. ते राजीनामा देण्यास तयार नव्हते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री मुंडेंचा राजीनामा घेतला आहे, असे करुणा मुंडे यांनी सांगितले.
हे ही वाचा :
लोककला आणि नाटक याबाबत अधिक संशोधन करा
तेलंगणा: रमजानमुळे काँग्रेस सरकारने दहावीच्या परीक्षेत केला बदल!
रेल्वे ट्रॅकवर लोखंडी बोल्ट आणि दगड ठेवणाऱ्या इबादुल्ला आणि अन्वरुलला अटक!
‘संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली!’…रोहित पवारांनी केला दावा
त्या पुढे म्हणाल्या, ५० टक्के न्याय मिळाला आहे. सीबीआयने चांगली चौकशी केली आहे. वाल्मिक कराडवर आरोप सिध्द झाले आहेत, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील केली होती. मंत्री मुंडेंच्या मागणीनुसार कोर्ट आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे ऐकले पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.