रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणानंतर झारखंड सरकारनेही रमजानबाबत एक आदेश जारी करत मोठा निर्णय घेतला आहे. हेमंत सोरेन सरकारने रमजान महिन्यात मुस्लिम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामामध्ये विशेष सूट दिली आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशात दररोज दुपारी ४ वाजता सुट्टीची परवानगी आणि शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी दुपारी विशेष सुट्टीचा समावेश आहे. दरम्यान, हेमंत सोरेन सरकारच्या या निर्णयावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी झामुमो सरकारच्या आदेशावर मोठा प्रश्न उपस्थित केला. सोशल मिडीयावर ट्वीटकरत म्हणाले, “झारखंडला इस्लामिक राज्य घोषित करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचा हात फक्त मुस्लिमांच्या पाठीशी आहे.”
खासदार निशिकांत दुबे यांनी सरकारच्या आदेशाची प्रत देखील पोस्ट केली. झारखंड सरकारने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, रमजान दरम्यान मुस्लिम कर्मचाऱ्यांना दररोज दुपारी ४ वाजल्यापासून कार्यालय सोडण्याची परवानगी असेल. याशिवाय, रमजान महिन्यात दर शुक्रवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत नमाज अदा करण्यासाठी विशेष परवानगी दिली जाईल. राज्यपाल आणि सहसचिवांना हवाला देऊन हा आदेश जारी करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय, उद्या राजीनामा देतील!
लोककला आणि नाटक याबाबत अधिक संशोधन करा
तेलंगणा: रमजानमुळे काँग्रेस सरकारने दहावीच्या परीक्षेत केला बदल!
‘संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली!’…रोहित पवारांनी केला दावा
दरम्यान, यापूर्वी तेलंगणा सरकारनेही रमजान महिन्यात राज्यातील सर्व मुस्लिम सरकारी कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विशेष सूट देण्याची घोषणा केली होती. सरकारी आदेशानुसार, या कर्मचाऱ्यांना २ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत दुपारी ४ वाजेपर्यंत काम करण्याचे सांगण्यात आले आहे. ४ नंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे. तथापि, जर कोणत्याही कर्मचाऱ्याचे काम जास्त आवश्यक असेल तर त्याला कार्यालयातच राहावे लागेल, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तेलंगणाच्या मुख्य सचिव शांती कुमारी यांनी हा आदेश जारी केला होता. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर भाजपाने जोरदार टीका केली.
भाजप नेते अमित मालवीय यांनी या आदेशाला मुस्लिम समुदायाला खुश करण्याचा प्रयत्न म्हटले. ते म्हणाले की, नवरात्रीसारख्या हिंदू सणांमध्ये हिंदू कर्मचाऱ्यांना अशी कोणतीही सूट मिळत नाही. अमित मालवीय यांनी विरोध दर्शवत याला व्होट बँकेचे राजकारण म्हटले.
झारखंड राज्य को इस्लामिक राज्य घोषित करने का समय आ गया है। कांग्रेस का हाथ केवल मुसलमानों के साथ pic.twitter.com/DSoUewuxqN
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) March 2, 2025