25 C
Mumbai
Friday, February 13, 2026
घरविशेषशिंदेंनी पहिल्यांदा तर अजित पवारांनी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ!

शिंदेंनी पहिल्यांदा तर अजित पवारांनी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ!

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

Google News Follow

Related

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे २१ वे मुख्यमंत्री बनले आहेत. देवेंद्र फडणवीसांना आज मुखमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली. यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या शपथ सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार असलेले २२ राज्यांचे मुख्यमंत्री आले होते. उद्योगपती आणि बॉलीवूड स्टार सोहळ्यासाठी आले होते. शेकडो दिग्गज व्यक्ती, साधू-महंत आणि हजारो नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते.

हे ही वाचा : 

फडणवीसांना गादीसाठी नाहीतर लोकांच्या सेवेसाठी पुन्हा यायचे होते!

“मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…”

‘काम नीट न केल्यास बुलडोझरखाली टाकू’

बिहार : इन्स्पेक्टर खानने तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग

देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत विक्रम केला. त्यांनी तब्बल सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा