उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये उत्खननादरम्यान शिवलिंग सापडले!

दर्शनसाठी लोकांची गर्दी

उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये उत्खननादरम्यान शिवलिंग सापडले!

उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये उत्खननादरम्यान शिवलिंग सापडले आहे. शिवलिंग सापडल्यानंतर ग्रामस्थांमध्ये आनंदाची लाट पसरली असून शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या भागातील लोकही येवू लागले आहेत. माहिती मिळताच पोलिसांचे पथकही तिथे पोहोचले आहे. महाशिवरात्रीपूर्वी शिवलिंग सापडणे हे शुभ असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

हे प्रकरण हापूरच्या बाबूगड पोलीस स्टेशन परिसरातील आहे. रसूलपूर गावातील जंगलात उत्खननादरम्यान हे शिवलिंग सापडले. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे एक फुटी शिवलिंगाची ही मूर्ती आहे. रसूलपूर गावातील रहिवासी असलेले राजेंद्र सिंह यांना ही शिवलिंगाची मूर्ती सापडली.

ते म्हणाले, दातून आणण्यासाठी जंगलात गेलो होतो. याच दरम्यान, एका ठिकाणी सापांचा समूह दिसून आला. थोड्यावेळ्या नंतर सापांचा समूह तेथून निघून गेल्यानंतर गावकऱ्यांना याची माहिती दिली. घटनास्थळी २०-२५ गावकऱ्यांना बोलवून खोदकाम सुरु केले. गावकऱ्यांच्या समोरच उत्खननादरम्यान एक फुटी शिवलिंगाची मूर्ती सापडली, असे राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

२७० किलोचा बार मानेवर पडल्याने १७ वर्षीय पॉवर लिफ्टरचा मृत्यू!

मुंब्र्याला उतरता आले नाही म्हणून शेख जिया हुसेनचा चाकू हल्ला

मध्य प्रदेशनंतर आता गोव्यातही ‘छावा’ सिनेमा करमुक्त!

भाजपकडून राहुल गांधी लक्ष्य

शिवलिंग सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची गर्दी जमली. गावातील आणि इतर भागातील भाविकही शिवलिंगाची पूजा करण्यासाठी आणि दूध अभिषेक करण्यासाठी येऊ लागले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले.

स्टेशन प्रभारी विजय गुप्ता म्हणाले की, उत्खननादरम्यान शिवलिंग सापडले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे आणि या प्रकरणी तपास सुरू आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखली जात असून दर्शनासाठी लोक ये-जा करत आहेत. दरम्यान, सध्या ही घटना लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे.

 

Exit mobile version