राजस्थानमधील बिकानेरमध्ये एक भीषण अपघात घडला. पॉवरलिफ्टिंगच्या सरावादरम्यान एका १७ वर्षीय महिला राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू झाला आहे. यश्तिका आचार्य असे मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे. सरावादरम्यान २७० किलो वजनी बार महिला खेळाडूच्या मानेवर पडल्याने पडला. अपघातानंतर खेळाडूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी खेळाडूला मृत घोषित केले.
पोलिसांनी सांगितले की, यश्तिका जिममध्ये सराव करत असताना हा अपघात झाला. सरावादरम्यान खेळाडू २७० वजनाच्या प्लेट्स बसवलेला बार उचलण्याचा प्रयत्न करत होती. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये खेळाडू २७० किलो वजनी बार उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तिने बार उचलत मानेच्या मागच्या बाजूला ठेवत तोल सांभाळण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तिला गेला आणि बारसहित ती मागच्या बाजूला कोसळली. यावेळी २७० किलोचा वजनी बार मानेवर पडल्याने तिची मान मोडते आणि ते बेशुद्ध पडली.
हे ही वाचा :
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी धोक्यात? न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा
बीरभूम बॉम्बस्फोट : टीएमसी नेता बबलू मोंडलला १० वर्षांची शिक्षा
अमेरिकेतून हद्दपार झालेल्यांच्या यादीत पंजाबचा माणूस, अद्याप परतलेला नाही; कुटुंबाशी संपर्क नाही!
महाकुंभ मेळ्याबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या १०१ अकाउंट्सवर कारवाईचा बडगा
घटनेवेळी तिचे प्रशिक्षकही सोबत होते, ते देखील जखमी झाले. खेळाडूचा तोल जात असताना प्रशिक्षकांनी बचावाचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. घटनेनंतर खेळाडूला त्वरित रुग्णालयात करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून खेळाडूला मृत घोषित केले.
पोलिसांनी सांगितले, या घटनेबाबत मृत खेळाडूच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. शवविच्छेदनानंतर यश्तिकाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला. दरम्यान, यश्तिकाने नुकतेच गोव्यात झालेल्या ३३ व्या राष्ट्रीय बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये इक्विप्ड प्रकारात सुवर्ण आणि क्लासिक प्रकारात रौप्य पदक जिंकले होते.