कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका देत त्यांच्यासह त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना शिक्षा सुनावली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षांचा कारावास आणि ५०,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. १९९५ साली कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणुक केल्याच्या प्रकरणात ही शिक्षा माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांना सुनावण्यात आली आहे.
१९९५ साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. याचं प्रकरणात आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
प्रकरण काय?
१९९५- १९९७ च्या दरम्यानचे हे प्रकरण असून माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी त्यांचे उत्पन्न कमी असल्याचे दाखवून दुसरे घर नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका मिळाल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण चार जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने उर्वरित दोघांना कोणतेही शिक्षा सुनावलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा..
महाकुंभ मेळ्याबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या १०१ अकाउंट्सवर कारवाईचा बडगा
महाकुंभ: महिलांच्या स्नानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, पोलिसांकडून गुन्हा दाखल!
कर्नाटकमध्ये काश्मिरी विद्यार्थ्याचे रॅगिंग
रेखा गुप्ता यांच्यासोबत आणखी सहा नेते घेणार मंत्री पदाची घेणार शपथ
दरम्यान, न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्यांचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.