महाकुंभ आणि प्रयागराजशी संबंधित दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तब्बल १०१ सोशल मीडिया अकाउंट्सवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभमेळ्याबाबत खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती रोखण्यासाठी दिलेल्या निर्देशांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक (डीजीपी) प्रशांत कुमार यांच्या मते, दिशाभूल करणाऱ्या मजकुराच्या प्रसारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचा चुकीचं मजकूर रोखण्यासाठी एक व्यापक सायबर पेट्रोलिंग धोरण लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत उत्तर प्रदेश पोलिस आणि तज्ञ संस्था महाकुंभाशी संबंधित बनावट पोस्ट, अफवा आणि सायबर गुन्ह्यांसंबंधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत नजर ठेवत आहेत.
दरम्यान, काही अकाउंटवर पाकिस्तानच्या करक जिल्ह्यातील एका व्हिडिओला प्रयागराजमधील महाकुंभ चेंगराचेंगरीचा व्हिडीओ असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत होते. व्हिडिओसोबत ‘ये प्रयागराज है’ नावाचे एक गाणे होते, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की आपल्या पालकांची सेवा करूनही पापे धुतली जात नाहीत, परंतु येथे लोक त्यांचे पाप धुण्याचा प्रयत्न करताना आपले प्राण गमावत आहेत. पडताळणी केल्यानंतर, हे सिद्ध झाले की, फुटेजमध्ये जानेवारी २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या एका रस्ते अपघाताचे चित्रण करण्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून, महाकुंभमेळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचे खोटे चित्रण करून भीती निर्माण करण्याचा आणि कार्यक्रमाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोतवाली कुंभमेळा पोलिसांनी २६ सोशल मीडिया अकाउंट्सवर एफआयआर दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, महाकुंभमेळ्याच्या सुरुवातीपासून चुकीची माहिती पसरवल्याबद्दल १०१ वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर एकूण १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १३ जानेवारी रोजी, कुंभमेळ्याच्या परिसरात अग्निसुरक्षा मॉक ड्रिलला प्रत्यक्ष आगीची घटना म्हणून खोटे चित्रण करणाऱ्या एक्स अकाउंटवर गुन्हा दाखल करण्यात आला. २ फेब्रुवारी रोजी, नेपाळमधील एक व्हिडिओ शेअर करणाऱ्या सात अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली. ज्यांनी महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर पीडितांचे मृतदेह घेऊन जाणाऱ्या शोकाकुल कुटुंबांना दाखवल्याचा दिशाभूल करणारा दावा केला होता. तर, त्याच दिवशी एका इंस्टाग्राम अकाउंटवर एक नाट्यमय व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल आणि मृत भाविकांचे मृतदेह नदीत फेकले जात असल्याचा आणि त्यांचे अवयव बेकायदेशीरपणे काढले जात असल्याचा खोटा आरोप केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
🚨 Yogi Adityanath govt in ACTION.
Yogi Adityanath govt takes STRICT ACTION against 101 social media accounts.
— These accounts had spread 'misleading' information about Mahakumbh 🎯
— Now, Yogi Police will give them proper medicine. 🔥 pic.twitter.com/4iMy7QJmcc
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) February 19, 2025
पुढे ७ फेब्रुवारी रोजी, संगम परिसरातील गर्दी व्यवस्थापन प्रयत्नांचा व्हिडिओ चेंगराचेंगरी असल्याचे खोटे दावे पसरवणारे एक फेसबुक अकाउंट आढळले, ज्यावर कायदेशीर कारवाई झाली. ९ फेब्रुवारी रोजी, झारखंडमधील धनबाद येथील एका व्हिडिओचे चुकीचे वर्णन केल्याबद्दल १४ द्विटर अकाउंटवर गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, उत्तर प्रदेश पोलिस महाकुंभात बेपत्ता कुटुंबातील सदस्यांना शोधत असलेल्या भाविकांवर हल्ला करत आहेत. १२ फेब्रुवारी रोजी, गाजीपूरमधील २०२१ चा व्हिडिओ महाकुंभाशी खोटा जोडणाऱ्या सात अकाउंटवर गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यामध्ये चेंगराचेंगरीमुळे मृतदेह गंगेत तरंगत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
हेही वाचा..
महाकुंभ: महिलांच्या स्नानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, पोलिसांकडून गुन्हा दाखल!
कर्नाटकमध्ये काश्मिरी विद्यार्थ्याचे रॅगिंग
रेखा गुप्ता यांच्यासोबत आणखी सहा नेते घेणार मंत्री पदाची घेणार शपथ
शत्रुच्या दुप्पट सैन्याशी कसा केला शिवरायांनी सामना?
यापुढे, १३ फेब्रुवारी रोजी सात खात्यांवर २०२० मध्ये इजिप्तमधील आगीची घटना शेअर केली, ज्यामध्ये महाकुंभ बस स्टँडवर लागलेली आग असल्याचा खोटा दावा करण्यात आला, ज्यामध्ये अनेक वाहने जळून खाक झाल्याचे म्हटले. त्याच दिवशी, १५ अकाउंट्सनी २०२४ मध्ये बिहारमधील एका व्हिडिओचा वापर केला, जो मूळतः ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमातील होता, ज्यामध्ये राष्ट्रवादी आणि सनातनी भक्तांनी महाकुंभमेळ्यात लष्करी कर्मचाऱ्यांवर चप्पल फेकल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. १४ फेब्रुवारी रोजी, पोलिसांनी २२ अकाउंट्सवर कारवाई केली ज्यांनी उत्तराखंडमधील चंपावत येथील व्हिडिओबद्दल चुकीची माहिती दिली होती. ज्यामध्ये महाकुंभमेळ्यात हिंसक संघर्ष आणि दगडफेक झाल्याचा खोटा आरोप करण्यात आला होता. अखेर, १९ फेब्रुवारी रोजी, पाकिस्तान अपघाताचा व्हिडिओ महाकुंभमेळ्याशी जोडल्याबद्दल आणि तो चेंगराचेंगरीची घटना म्हणून खोटा दाखवल्याबद्दल २६ अकाउंट्सवर गुन्हा दाखल करण्यात आला.